मोबाईलने ‘मेमरी’ घालवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST2021-07-07T04:32:06+5:302021-07-07T04:32:06+5:30
सांगली : मोबाईलवरील परावलंबित्व इतके वाढले आहे की, आता बाहेरच्या लोकांचेच काय घरातील मोबाईल क्रमांकही आठवत नाहीत, अशी स्थिती ...

मोबाईलने ‘मेमरी’ घालवली
सांगली : मोबाईलवरील परावलंबित्व इतके वाढले आहे की, आता बाहेरच्या लोकांचेच काय घरातील मोबाईल क्रमांकही आठवत नाहीत, अशी स्थिती झाली आहे. बहुतांश घरांमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे.
पूर्वी तोंडी आकडेमोड करणे, लँडलाईन व मोबाईल क्रमांक लक्षात ठेवून ते डायलपॅडवर डायल करून कॉल करणे अशा गोष्टी अंगवळणी पडल्या होत्या. साध्या फोनची जागा स्मार्टफोनने घेतल्यानंतर कॉल करणे सोपे झाले. त्यामुळे मोबाईल क्रमांक लक्षात ठेवण्याची गरज कमी झाली. मोबाईलवरील अवलंबित्व अधिक वाढत गेले. त्यामुळे आता फार कमी लोकांनाच कुटुंबातील मोबाईल क्रमांक तोंडपाठ आहेत, अन्यथा क्रमांक लक्षात ठेवण्याची सर्व जबाबदारी लोकांनी मोबाईलवर सोपविली आहे.
चौकट
असे का होते?
आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन करणाऱ्या कॅस्परस्काय लॅबने या प्रकारास डिजिटल स्मृतीभंश असे म्हटले आहे.
मेंदूचा वापर कमी करून मोबाईल मेमरीचा वापर अधिक केल्याने नंबर व अन्य माहिती आपल्यास आठवत नाही
पूर्वी क्रमांक, आकडेमोड मेंदूच्या साहाय्याने करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे स्मृती चांगली होती.
चौकट
हे टाळण्यासाठी काय करावे?
किमान घरच्या लोकांचे मोबाईल क्रमांक लक्षात ठेवावेत.
घरच्या लोकांना पॅडवर क्रमांक डायल करून कॉल करावा
एटीएम पीन, खाते क्रमांकही लक्षात ठेवावेत
कोट
मोबाईल क्रमांक लक्षात नसणे ही समस्या नाही. पूर्वी कॅल्क्युलेटर्स नव्हते, त्यामुळे तोंडी आकडेमोड करावी लागत होती. आता त्याच्या वापरास परवानगी आहे. मोबाईलवर अवलंबित्व वाढल्याने आता क्रमांक लक्षात ठेवण्याची गरजही घटली आहे. तरीही ऐनवेळी घरच्यांशी संपर्क करण्यासाठी मोजके क्रमांक लक्षात ठेवावेत.
- डॉ. चारुदत्त कुलकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ, सांगली
कोट
पूर्वी सर्व क्रमांक आठवत होते. आता मोबाईलचा वापर होत असला तरी अद्याप घरच्या लोकांचे सर्व क्रमांक पाठ आहेत.
- गणपती जाधव, आजोबा
कोट
मम्मी, पप्पांचे मोबाईल नंबर माझ्या लक्षात आहेत. मोबाईलवर नंबर कसे शोधायचे माहीत नाहीत, पण मी नंबर लक्षात असल्याने कॉल करू शकतो. - ऋषी जाधव, बालक
कोट
सध्या मोबाईलमध्ये लगेच नंबर सापडत असल्याने ते लक्षात ठेवत नाही. मुलांच्या मात्र नंबर लक्षात आहेत. - ज्ञानेश्वर जाधव, पालक