शिराळ्यात माेबाईल दुकान फाेडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:11 IST2020-12-05T05:11:36+5:302020-12-05T05:11:36+5:30

शिराळा : शिराळा येथील सोमवार पेठेत असणारे शिवशक्ती मोबाईल शॉपी हे माेबाईल विक्रीचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फाेडले. दुकानाचे कुलूप ...

Mobile shop opened in Shirala | शिराळ्यात माेबाईल दुकान फाेडले

शिराळ्यात माेबाईल दुकान फाेडले

शिराळा : शिराळा येथील सोमवार पेठेत असणारे शिवशक्ती मोबाईल शॉपी हे माेबाईल विक्रीचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फाेडले. दुकानाचे कुलूप तोडून अडीच लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरून नेले आहेेत. ही घटना गुरुवार दि. ३ राेजी रात्री घडली. याबाबत शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शिराळ्याची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या सोमवार पेठेत संदीप अरुण शेटे यांचे मोबाईलचे दुकान आहे. गुरुवारी रात्री ८:३० ते शुक्रवारी सकाळी ९ च्या दरम्यान या दुकानाचे कुलूप तोडून, विक्रीसाठी आणलेले २ लाख ४२ हजार रुपये किमतीचे २० ते २२ मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यावर चोरीची घटना शेटे यांच्या लक्षात आली. याबाबत शिराळा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास हवालदार पी. व्ही. रजपूत करीत आहेत.

Web Title: Mobile shop opened in Shirala