मनसे पुन्हा विकास आघाडीच्या नादाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:15 IST2021-02-19T04:15:48+5:302021-02-19T04:15:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : गत पालिका निवडणुकीत नानासाहेब महाडिक यांच्या शब्दामुळे मनसेचे शहराध्यक्ष सनी खराडे यांनी निवडणुकीतून माघार ...

मनसे पुन्हा विकास आघाडीच्या नादाला
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : गत पालिका निवडणुकीत नानासाहेब महाडिक यांच्या शब्दामुळे मनसेचे शहराध्यक्ष सनी खराडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. परंतु स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीसमयी त्यांना डावलले. आगामी निवडणुकीत मनसे पुन्हा विकास आघाडीत सक्रिय होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.
पालिकेतील पक्षप्रतोद विक्रमभाऊ पाटील आणि सनी खराडे यांनी एकत्रित येऊन इस्लामपुरात वाहनधारकांसाठी पासिंग ट्रॅक झाला नाही, तर तहसील कार्यालयावर घेराव घालून बंद पाडू, असा इशारा दिला आहे. ही भूमिका आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतल्याची चर्चा आहे. स्वीकृत नगरसेवक निवडीसमयी खराडे यांच्यावर अन्याय झाल्याचा मनसेतून आरोप आहे.
इस्लामपूर शहरात ४०० हून अधिक अधिकृत रिक्षा आहेत. त्यातच विक्रमभाऊ पाटील यांनी यापूर्वी वडाप संघटनेचे नेतृत्व केले आहे. यामुळेच सनी खराडे यांनी पाटील यांची साथ घेऊन रिक्षा संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यातूनच आगामी पालिका निवडणुकीत मनसे आपली ताकद अजमावणार आहे. वाळवा तालुका अॅटो रिक्षा चालक-मालक संघटनेची स्थापना माजी नगराध्यक्ष चंद्रकांत खराडे यांनी केली आहे. हीच संघटना सनी खराडे चालवत आहेत. इस्लामपूरसह वाळआ तालुक्यातील वाहनधारकांकडून कररूपाने परिवहन खात्याकडे (आरटीओ) वर्षाकाठी १० कोटीहून अधिक रक्कम जमा होते. त्यामुळे इस्लामपूर येथे विभागीय कार्यालय व्हावे, ही मागणी पूर्वीपासूनच आहे. परंतु याकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याने भाजप आणि मनसे एकत्रित येऊन लढा देण्याच्या तयारीत असले तरी, त्यांचा मुख्य उद्देश आगामी पालिका निवडणुकीचे रणांगण आहे.
कोट
रिक्षा संघटना राजकारणविरहित आहे. विकास आघाडीने दिलेले शब्द पाळले नाहीत. वाहनधारकांसाठी पार्सिंग आणि नवीन लायसन्ससाठी इस्लामपूूर येथे उपप्रादेशिक कार्यालय होण्याची मागणी वारंवार करूनही याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळेच विक्रमभाऊ पाटील यांना घेऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
- सनी खराडे, शहराध्यक्ष, मनसे
फोटो - १८०२२०२१-आयएसएलएम-राजकीय न्यूज
विक्रमभाऊ पाटील सनी खराडे