शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

Sangli News: जयंत पाटलांची सहकारातून एक्झिट; 'राजारामबापू'ची निवडणूक बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 16:52 IST

जयंतरावांच्या सहकार क्षेत्रातील एक्झिटमुळे एकच खळबळ

युनूस शेखइस्लामपूर : राज्याच्या सहकार क्षेत्रात अग्रेसर आणि नावलौकिक असणाऱ्या येथील राजारामबापू साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक अपेक्षेनुसार बिनविरोध झाली. मात्र नव्या पिढीकडे सत्तेची सूत्रे सोपवताना सहकारातील प्रगाढ ज्ञान प्राप्त केलेल्या माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी तब्बल ३७ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर संचालक मंडळातून बाहेर पडण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आणि आज तो अंमलातही आणल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. जयंतरावांच्या सहकार क्षेत्रातील एक्झिटमुळे एकच खळबळ उडाली.उपाध्यक्ष विजय पाटील यांच्यासह प्रदीपकुमार पाटील, देवराज पाटील, बाळासाहेब पवार, कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, दादासाहेब मोरे आणि मेघा मधुकर पाटील या आठ जुन्या संचालकांना पुन्हा संधी मिळाली आहे. तर नव्या चेहऱ्यात युवा नेते प्रतिक पाटील, दीपक पाटील, शैलेश पाटील, अतुल पाटील, अमरसिंह साळुंखे, बबन थोटे, रघुनाथ जाधव, योजना सचिन पाटील, आप्पासाहेब हाके, हणमंत माळी आणि राजकुमार कांबळे यांचा समावेश आहे.सहकार क्षेत्रातील एका कारखान्याच्या चार शाखा काढत देशाच्या पातळीवर विक्रम नोंदविण्याची कामगिरी राजारामबापू कारखान्याने केली आहे. याचे सर्व श्रेय जयंत पाटील यांना जाते. बापूंच्या निधनानंतर १९८४ साली वाळवा तालुक्याच्या सार्वजनिक जीवनात आलेल्या जयंत पाटील यांनी आपली सुरुवात सहकारातून केली. त्यावेळची पाण्याची परिस्थिती पाहून आणि बापूंनी त्यांच्या कारकिर्दीत घेऊन ठेवलेले पाणी परवाने वापरात आणण्यासाठी पदयात्रा काढत जयंतरावांनी अवघ्या समाजमनावर आपल्या प्रतिमेचे गारूड उभा करण्यात यश मिळविले. त्यानंतर थेट कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यावर तेव्हापासून अत्याधुनिकीकरणाकडे सुरू झालेला राजारामबापू कारखान्याचा प्रवास आजही अखंडपणे टिकून आहे. सहवीज निर्मिती प्रकल्प, अर्कशाला, असिटोन निर्मिती त्यानंतर आता इथेनॉल असा उपपदार्थ निर्मितीच्या संकल्पनाही खुद्द जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या गेल्या.आता कारखान्याच्या सत्तेची सूत्रे नव्या आणि तिसऱ्या पिढीतील युवा नेते प्रतिक पाटील यांच्याकडे सोपविली जाण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यांना त्यांची कामगिरी उत्कृष्टपणे करताना निर्णय प्रक्रियेतही खुलेपणा रहावा असा विचार करून जयंत पाटील यांनी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच नव्या रक्ताला वाव देण्यासाठी मी स्वतः थांबणार आहे असे सांगत अनेक सहकाऱ्यांना अर्ज भरण्याच्या पहिल्या टप्प्यातच थांबवले होते. त्यानंतर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी जयंत पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेत सर्वांनाच धक्का दिला.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलSugar factoryसाखर कारखाने