शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटातील आमदार अनिल बाबर २०२४ ची निवडणूक लढविणार नाहीत, गोपीचंद पडळकरांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 11:45 IST

'खानापूर मतदारसंघात भाजपचा आमदार निवडून आणायचा'

दिलीप मोहिते विटा (सांगली) : मी २०१९ ला बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवित होतो. त्यावेळी आमदार बाबर व त्यांचे पुत्र अमोल बाबर यांनी बारामतीच्या क्लब हाऊसमधील पहाटेच्या बैठकीत मला २०२४ ला तुमच्या पाठीशी राहत असल्याचा शब्द दिला होता. तो शब्द आता ते पिता-पुत्र पाळतील. त्यामुळे बाबर हे खानापूर मतदारसंघात २०२४ ची निवडणूक लढविणार नाहीत, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.मोही (ता.खानापूर) येथील ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच व सदस्यांच्या सत्कार समारंभासाठी आले असता त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत बारामती येथे आ. बाबर, अमोल बाबर यांच्यात पहाटे झालेल्या गोपनीय बैठकीचा उलघडा केला.आमदार पडळकर म्हणाले, खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर हे केवळ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळेच २०१९ ला आमदार झाले आहेत. मी बारामतीमधून निवडणूक लढवित असताना बाबर व त्यांचे जेष्ठ पूत्र अमोल बाबर हे पहाटे पाच वाजता बारामतीत क्लब हाऊसला मला भेटण्यासाठी आले होते.त्यावेळी अमोल बाबर यांनी अनिलभाऊंचे वय झाले आहे. त्यामुळे आमची आता ही शेवटचीच निवडणूक असल्याने कसल्याही परिस्थितीत २०१९ ला अनिलभाऊंना आमदार करा. पुढील २०२४ च्या निवडणूकीत आम्ही तुम्हाला पाठींबा देऊ, असा शब्द बाबर पिता-पुत्राने दिला होता. त्यामुळे खालच्या कार्यकर्त्यांनी आता गडबड करू नये. मी त्यांचे काम केले आहे.या बारामती बैठकीतील शब्दाबाबत बाबर पिता-पुत्र मतदारसंघातील लोकांना सांगतील, असे मला वाटले होते. मात्र, त्यांच्याकडून काहीही सांगितले जात नसल्याने लोकांना माहित असावे म्हणून एवढ्या दिवसानंतर मलाच सांगण्याची वेळ आली आहे. मात्र, २०२४ ची निवडणूक भाजपच्या नेतृत्वाखाली ताकदीने लढवायची आहे व आ. बाबर, अमोल बाबर आणि सुहास बाबर यांच्या पाठींब्यावर खानापूर मतदारसंघात भाजपचा आमदार निवडून आणायचा आहे.खानापूर मतदारसंघातील संघर्षाच्या राजकारणाला यापुढे मूठमाती देऊन चुकीचे राजकारण चुलीत घालून चांगल्या राजकारणाबरोबर आपल्याला जायचे आहे. मात्र, बाबर पिता-पुत्रांनी दिलेल्या शब्दानुसार खानापूर मतदारसंघात आ. अनिल बाबर २०२४ ची निवडणूक लढविणार नाहीत, असा पुर्नउच्चारही आ. गोपीचंद पडळकर यांनी केला.

टॅग्स :SangliसांगलीGopichand Padalkarगोपीचंद पडळकरBJPभाजपा