मरळनाथपूर येथील पॅरा मिलिटरी जवान बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:46 IST2020-01-13T00:46:39+5:302020-01-13T00:46:49+5:30

इस्लामपूर : मरळनाथपूर (ता. वाळवा) येथील पॅरा मिलिटरी जवान वैभव दिनकर खोत (वय ३0) हे ३0 डिसेंबरपासून बेपत्ता झाले ...

Missing paramilitary personnel at Marlnathpur | मरळनाथपूर येथील पॅरा मिलिटरी जवान बेपत्ता

वैभव दिनकर खोत

इस्लामपूर : मरळनाथपूर (ता. वाळवा) येथील पॅरा मिलिटरी जवान वैभव दिनकर खोत (वय ३0) हे ३0 डिसेंबरपासून बेपत्ता झाले आहेत. गेल्या १२ दिवसांपासून त्यांचा शोध न लागल्याने रविवारी त्यांच्या पत्नी अमृता वैभव खोत (२३) यांनी पोलिसांत वर्दी दिली आहे.
वैभव हे पंजाबमधील जालंदर शहर येथे इंडो—तिबेट बॉर्डर फोर्समध्ये सेवेत आहेत. ७ डिसेंबर रोजी ते मरळनाथपूर गावी सुटीवर आले होते. सुटी संपल्यानंतर ३0 डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता ते पंजाब येथे सेवेत रुजू होण्यासाठी निघाले. १ जानेवारीपर्यंत पत्नी अमृता यांच्याशी संपर्क साधत होती. त्यादिवशी, मी पंजाब येथे पोहोचलो असून थोड्या वेळात कँपमध्ये जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क केला असता वैभव यांनी फोन घेतला नाही. त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. पंजाब येथील कँपमध्ये फोन केला असता, वैभव खोत अजून येथे आले नसून ते कामावर हजर झालेले नाहीत, असे सांगण्यात आले. त्यामुळे अमृता खोत यांनी पोलिसांत रितसर वर्दी दिली. याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

Web Title: Missing paramilitary personnel at Marlnathpur