शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

निधीची तरतूद करताना सांगलीबाबत दुजाभाव, आमदार विश्वजित कदम यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 13:49 IST

कडेगाव : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण व माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सांगली जिल्ह्याला निधी देताना शासनाकडून दुजाभाव ...

कडेगाव : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण व माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सांगली जिल्ह्याला निधी देताना शासनाकडून दुजाभाव केला जात आहे. याबद्दल खेद वाटतो, असे सांगत आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सांगली जिल्ह्यातील अनेक ज्वलंत प्रश्न मांडले.विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा करताना डॉ. विश्वजित कदम बोलत होते. यावेळी डॉ. कदम म्हणाले, ताकारी म्हैसाळ योजनेसाठी ४५० कोटींची तरतूद केली. परंतु, आणखी वाढीव ३०० कोटींची तरतूद केली तर योजनेची रखडलेली कामे पूर्ण करता येतील. टेंभू योजनेसाठी २०० कोटींची तरतूद केली आहे. मात्र टेंभू योजनेच्या अपूर्ण कामांच्या पूर्णत्वासाठी आणखी ४०० कोटींची गरज आहे.सांगली जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळी आहेत तर काही तालुके सधन आहेत. दुष्काळी जत तालुक्यात आजही अनेक ठिकाणी पाणीटंचाई भासत आहे. याचवेळी जिल्ह्यात उद्भवणारी दुष्काळी परिस्थिती, पूर परिस्थितीवर योग्य त्या उपाययोजनांसाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली.सांगली शहरातील शेरीनाला प्रकल्प निधीअभावी अपूर्ण आहे. या प्रकल्पासाठी १०० कोटींची गरज आहे. मिरज शहरातील भुयारी गटार योजनेसाठी २४ कोटींची तरतूद करावी. स्व. यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव असलेल्या देवराष्ट्रे गावासाठी जन्मशताब्दी वर्षात माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी २ कोटी १७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या गावासाठी आता १० कोटींच्या निधीची तरतूद करावी, अशी मागणी डॉ. विश्वजित कदम यांनी केली. यावेळी जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर त्यांनी विधिमंडळाचे लक्ष वेधले व जिल्ह्याबाबत दुजाभाव होतोय, असे सांगत सरकारवर जोरदार टीका केली.दहा अश्वशक्तीवरीलही वीजबिल माफ कराराज्यात ४६ लाख सहा हजार कृषिपंपधारक शेतकऱ्यांना वीजबिल माफी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजने’ची घोषणा केली आहे. मात्र साडेसात अश्वशक्तीपर्यंत कृषिपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना या वीजबिल माफीचा फायदा होणार आहे. कृष्णाकाठी शेतकऱ्यांना नाईलाजाने १० एचपीचे पंप बसवावे लागतात. शासनाने १० एचपी किंवा त्यावरील वीजबिलही माफ करावे, अशी मागणी आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केली.

टॅग्स :Sangliसांगलीvidhan sabhaविधानसभाVishwajeet Kadamविश्वजीत कदमfundsनिधी