Mirajat kills a third party with a knife | मिरजेत तृतीयपंथीयाचा चाकूने भोकसून खून
मिरजेत तृतीयपंथीयाचा चाकूने भोकसून खून

ठळक मुद्देमिरजेत तृतीयपंथीयाचा चाकूने भोकसून खूनपथक तपासासाठी मिरजेत रवाना

मिरज : शहर बसस्थानकालगत असणाऱ्या एका कॉम्प्लेक्स मध्ये गौस रज्जाक शेख उर्फ काजल.(वय 35 रा.सिद्धार्थ वसाहत, कुरणे वाड्यामागे, मिरज ) या तृतीयपंतीयाचा रेल्वेस्टेशन रोडवरील कॉम्प्लेक्समध्ये रात्री १२.३० ते १.०० वाजण्याच्या दरम्यान खून झाल्याने घटनेची वार्ता परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली .

घटनास्थळी काही आक्षेपार्ह साहित्य सापडले आहे.आरोपीचा शोध पोलिस घेत आहे. माहिती समजताच डिवायएसपी संदिपसिंह गिल यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक तपासासाठी मिरजेत रवाना झाले आहे.आरोपीची प्राथमिक माहिती मिळाल्याचे काही सुत्रांकडून सांगण्यात आले.


Web Title: Mirajat kills a third party with a knife
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.