मिरजेत रिक्षाचालकावर चाकूहल्ला करून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:19 IST2021-07-21T04:19:03+5:302021-07-21T04:19:03+5:30

मिरज : मिरजेत रेल्वेस्थानक व बसस्थानक परिसरात नशेखोरांच‍ा धुमाकूळ सुरूच आहे. सोमवारी रात्री ११.३० वाजता लियाकत महंमदहुसेन शेख (वय ...

Miraj stabbed the rickshaw puller and robbed him | मिरजेत रिक्षाचालकावर चाकूहल्ला करून लुटले

मिरजेत रिक्षाचालकावर चाकूहल्ला करून लुटले

मिरज : मिरजेत रेल्वेस्थानक व बसस्थानक परिसरात नशेखोरांच‍ा धुमाकूळ सुरूच आहे. सोमवारी रात्री ११.३० वाजता लियाकत महंमदहुसेन शेख (वय ४९, रा. सुभाषनगर) या रिक्षाचालकावर दोघा नशेखोरांनी चाकूहल्ला करून त्याच्याकडील रोख रक्कम काढून घेतली. याबाबत शेख यांनी गांधी चौकी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

मिरजेत रेल्वे व बसस्थानक परिसरात गेले दोन आठवडे नशेखोर तरुणांचा उपद्रव सुरू आहे. दोघा प्रवाशांच्या डोक्यात दगड घालून लुटमार करण्यात आली. येथे थांबलेल्या इंधन टँकरमध्ये चोरी करण्याचा प्रयत्नात क्लीनरला मारहाण करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी रेल्वेस्थानकाजवळील कपड्याचे दुकान फोडून लाखोंचे कपडे चोरी करण्यात आले. सोमवारी रात्रीही दोघा नशेखोरांनी रिक्षाचालक लियाकत शेख लघुशंकेसाठी थांबले असता त्यांच्यावर लुटमारीच्या उद्देशाने चाकूहल्ला केला. हातावर वार व मारहाण करून शेख यांच्याकडून सहाशे रुपये रोख रक्कम हिसकावत पळ काढला. याबाबत शेख यांनी गांधी चौकी पोलिसांत फिर्याद दिली असून, अज्ञात दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Miraj stabbed the rickshaw puller and robbed him