कोट्यवधीच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी मिरजेत छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:53 IST2020-12-11T04:53:20+5:302020-12-11T04:53:20+5:30

या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी जीएसटी विभागाने मिरजेतील शिवाजी चाैकातील विशाल कम्युनिकेशनवर छापा टाकला. यावेळी घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे व ...

Miraj raid on multi-crore GST scam | कोट्यवधीच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी मिरजेत छापा

कोट्यवधीच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी मिरजेत छापा

या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी जीएसटी विभागाने मिरजेतील शिवाजी चाैकातील विशाल कम्युनिकेशनवर छापा टाकला. यावेळी घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे व संबंधित व्यावसायिकास ताब्यात घेऊन चाैकशीसाठी कोल्हापूरला नेल्याची माहिती मिळाली. मोबाईल विक्री, मोबाईल व डिश रिचार्जचा मोठा व्यवसाय करणाऱ्या संबंधित व्यावसायिकाने बनावट पावत्यांच्या आधारावर ‘इनपुट टॅक्स’ जमा करून कोटी रुपये कर बुडवून फसवणूक केल्याचा आरोप आहे.

जीएसटी विभागाकडे नोंदणी केलेल्या उद्योगामार्फत काही कोटींची बिले घेऊन या उलाढालीचा १८ टक्के परतावा घेतला असल्याचा जीएसटी विभागाचा संशय आहे. केवळ कागदावरच अस्तित्व असलेल्या जीएसटी इनव्हॉईस असलेल्या उद्योगांना कोणत्याही वस्तू व सेवांचा पुरवठा न करता जीएसटी पावत्या देऊन या पावत्यांच्याआधारे एक कोटी रुपये जीएसटी परतावा घेण्यात आल्याबद्दल संबंधित व्यावसायिकाची चाैकशी करण्यात येत आहे. सुमारे एक कोटी रुपयांच्या घोटाळ्यात उद्योगाद्वारे झालेली काही कोटींच्या उलाढालीची चाैकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.

Web Title: Miraj raid on multi-crore GST scam