मिरजेत महापालिकेतर्फे २०८ जणांची अचानक कोविड तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:18 IST2021-06-27T04:18:31+5:302021-06-27T04:18:31+5:30

महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी मिरज मार्केट परिसरात अचानक भेट देऊन विनाकारण विनामास्क फिरणाऱ्या ६० नागरिकांची अग्निशमन विभागासमोर आरटीपीसीआर ...

Miraj Municipal Corporation conducts surprise inspection of 208 persons | मिरजेत महापालिकेतर्फे २०८ जणांची अचानक कोविड तपासणी

मिरजेत महापालिकेतर्फे २०८ जणांची अचानक कोविड तपासणी

महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी मिरज मार्केट परिसरात अचानक भेट देऊन विनाकारण विनामास्क फिरणाऱ्या ६० नागरिकांची अग्निशमन विभागासमोर आरटीपीसीआर व अँटिजेन तपासणी केली . तपासणीत सर्व नागरिक विक्रेते निगेटिव्ह आले.

उपायुक्त स्मृती पाटील, सहायक आयुक्त दिलीप घोरपडे, आरोग्याधिकारी डॉ. रेखा खरात, स्वच्छता निरीक्षक नितीन कांबळे, निखील कोलप, मेधाराणी कांबळे, अक्षय कोलप यांच्या पथकाने लोणी बाजार परिसर, शिवाजीरोड, महात्मा गांधी चौक परिसरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली.

लोणी बाजार परिसरात १२३ व शिवाजीरोड परिसरात २५ अशा १४८ जणांच्या अँटिजन तपासणीत सर्व नागरिक व भाजीपाला विक्रेते निगेटिव्ह आले. यावेळी विनामास्क फिरणाऱ्या व नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून संबंधितांकडून सात हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

Web Title: Miraj Municipal Corporation conducts surprise inspection of 208 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.