मिरज हायस्कूलला विजेतेपद
By Admin | Updated: July 22, 2015 23:53 IST2015-07-22T23:26:33+5:302015-07-22T23:53:47+5:30
सुब्रतो मुखर्जी फुटबॉल : विभागीय स्पर्धा कोल्हापुरात

मिरज हायस्कूलला विजेतेपद
सांगली : जिल्हा क्रीडा संकुलामध्ये झालेल्या चौदा वर्षांखालील शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत मिरज हायस्कूलच्या संघाने विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अंतिम सामना मिरज हायस्कूल विरुद्ध पोदार इंटरनॅशनल स्कूल यांच्यात झाला. मिरज हायस्कूलने ४-० असा चार गोलने एकतर्फी विजय मिळविला. यामध्ये अनिकेत शिंदे, सौरव सणस, विक्रम लावंड, आदित्य जायकर यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवून संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
स्पर्धेत एकूण १४ संघ सहभागी झाले होते. उद्घाटन महापालिकेचे उपायुक्त सुनील नाईक यांच्या हस्ते झाले. जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी स्वागत केले. सुनील कोळी यांनी संयोजन केले. यावेळी शारीरिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन झेंडे, सुधाकर जमादार, शंकर भास्करे, उमेश बडवे, आय. बी. स्वामी, भगवान मस्के, सी. एन. गुजर, आदी उपस्थित होते.
विजेता मिरज हायस्कूलचा संघ असा : रोहन राठोड, अनिकेत शिंदे, महेश जाधव, सौरव सणस, विकास भिसे, मयूर धनवडे, विक्रम लावंड, आदित्य जायकर, शशांक कांबळे, सूरज जाधव, अभिषेक कांबळे, अमीर मुलाणी, विश्वजित तरडे, गौरव जरग, प्रकाश गडदे, गणेश मोहिते.
विजय ठाणेदार, अक्षय मंडले, सोहेल शेख, धर्मेश कांबळे, अनिल शिकलगार, राजू कांबळे, विजय सोनवले यांनी पंच म्हणून काम पाहिले. (क्रीडा प्रतिनिधी)