मिरज-हातकणंगले लोकल रेल्वे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 22:59 IST2019-08-12T22:59:19+5:302019-08-12T22:59:26+5:30

रेल्वे ट्रॅक तपासणीनंतर सोमवारी मिरज-हातकणंगले लोकल रेल्वे सुरू करण्यात आली.

Miraj-Hatakangle local train starts | मिरज-हातकणंगले लोकल रेल्वे सुरू

मिरज-हातकणंगले लोकल रेल्वे सुरू

जयसिंगपूर: रेल्वे ट्रॅक तपासणीनंतर सोमवारी मिरज-हातकणंगले लोकल रेल्वे सुरू करण्यात आली. दुपारनंतर रेल्वे प्रशासनाने पहिली रेल्वे मार्गस्थ केली. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला. टप्याटप्याने फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.
पुराचे पाणी कमी होत असल्याने रविवारी रेल्वे यंत्रणेकडून मिरज-कोल्हापूर मार्गावर रेल्वे ट्रॅक तपासणी करण्यात आली. मालवाहतूक रेल्वे गाडीने रेल्वे रस्ता कुठे खराब झाला आहे का याची पाहणी करण्यात आली होती. पंचगंगेच्या पुरामुळे मिरज ते रुकडी मार्गापर्यंतच तपासणी करण्यात आली.

महापुराच्या वाढत्या पाण्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णतः बंद झाली होती. मिरज-कोल्हापूर मार्गावर लोकल रेल्वे सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा रस्ता कोठे खराब झाला आहे का याची अधिका-यांबरोबर यंत्रणेने पाहणी केली होती. दरम्यान सोमवारी मिरजहून, जयसिंगपूर, निमशिरगांव, हातकणंगले अशी लोकल रेल्वे सुरू करण्यात आली.

Web Title: Miraj-Hatakangle local train starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.