मिरज शासकीय रुग्णालय पुन्हा कोविड रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:34 IST2021-02-27T04:34:34+5:302021-02-27T04:34:34+5:30
सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांवर लवकर उपचार व्हावेत यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत ...

मिरज शासकीय रुग्णालय पुन्हा कोविड रुग्णालय
सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांवर लवकर उपचार व्हावेत यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सोमवारपासून पुन्हा एकदा कोविड रुग्णालय करण्यात येणार आहे. त्यामुळे नॉन कोविड रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांनी केले आहे.
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना २८ मार्चपासून मिरज रुग्णालयास कोविड रुग्णालय करण्यात आले होते. मात्र, बाधितांची संख्या कमी झाल्याने १ फेब्रुवारीपासून काही विभागांत उपचार सुरू करण्यात आले होेते. मात्र, आता पुन्हा रुग्णसंख्या वाढत असल्याने कोविड रुग्णांवरच मिरजेत उपचार होणार आहेत.