मिरजेत गांजा विक्री करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:32 IST2021-07-14T04:32:15+5:302021-07-14T04:32:15+5:30

सांगली : मिरज येथील जनावर बाजार आवार कमानीजवळ गांजा विक्री करणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. हुसेन ...

Miraj cannabis seller arrested | मिरजेत गांजा विक्री करणाऱ्यास अटक

मिरजेत गांजा विक्री करणाऱ्यास अटक

सांगली : मिरज येथील जनावर बाजार आवार कमानीजवळ गांजा विक्री करणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. हुसेन बादशहा सय्यद (वय २४, रा. कैकाडी गल्ली, मिरज) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचा एक किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात अवैधरित्या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक मिरज शहरात गस्तीवर असताना, झारीबाग चौकातून जनावर बाजाराकडे जाणाऱ्या रोडवर एक जण चहाच्या टपरीजवळ बसून गांजा विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा मारून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याजवळ १ किलो ७५ ग्रॅम वजनाचा गांजा व रोख ६२० रुपये मिळाले. त्याच्यावर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Miraj cannabis seller arrested