मिरजेत बंगला फोडून रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:33 IST2021-09-08T04:33:28+5:302021-09-08T04:33:28+5:30

मिरज : शहरातील रमा उद्यान येथे बंद बंगला फोडून चोरट्यांनी २५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. दि. ४ ते ...

Miraj broke the bungalow and stole cash | मिरजेत बंगला फोडून रोकड लंपास

मिरजेत बंगला फोडून रोकड लंपास

मिरज : शहरातील रमा उद्यान येथे बंद बंगला फोडून चोरट्यांनी २५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. दि. ४ ते ७ सप्टेंबरच्या कालावधीत ही चोरी झाली. याबाबत उमेश कृष्णा जाधव यांनी गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली आहे.

उमेश जाधव यांचा रमा उद्यान येथे फेज-२ मोरया नावाने बंगला आहे. चार ऑगस्ट रोजी ते व त्यांचे घरातील नातेवाईक सोलापूर जिह्यातील आपल्या गावी गेले होते. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी या बंगल्याचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला व कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले. त्यानंतर कपाटातील २५ हजार रोख रक्कम लंपास केली. उमेश जाधव हे घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचा हा प्रकार निदर्शनास आला. याबाबत त्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

दरम्यान, रमा उद्यान परिसरात चोऱ्यांच्या घटना वारंवार घडत आहेत. चोरट्यांनी बंद बंगल्यांनाच टार्गेट केले असून, यापूर्वीही अशाप्रकारे चोरीच्या घटना घडल्या आहेत. चोरटे पाळत ठेवून घरफोड्या करीत असल्याने पोलिसांनी रात्रीच्या सुमारास गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: Miraj broke the bungalow and stole cash