मीरा शिंदेंना ‘आदर्श महिला रत्न’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:06 IST2020-12-05T05:06:02+5:302020-12-05T05:06:02+5:30
शिराळा : मीरा संपतराव शिंदे यांना सह्याद्री सोशल फाऊंडेशनचा ‘आदर्श महिला रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. शैक्षणिक व ...

मीरा शिंदेंना ‘आदर्श महिला रत्न’ पुरस्कार
शिराळा : मीरा संपतराव शिंदे यांना सह्याद्री सोशल फाऊंडेशनचा ‘आदर्श महिला रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. शैक्षणिक व सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार कोल्हापूरची सिनेअभिनेत्री अर्चना तेंडुलकर, कोल्हापूरचे जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष पुंडलिकराव जाधव आदींच्याहस्ते देऊन गौरविण्यात आले.
इस्लामपुरातील विद्या मंदिर हायस्कूल येथे शिक्षिका म्हणून त्या काम करीत आहेत. उत्कृष्ट गायिका आहेत. सांगलीतील साक्षी, गीत रंग, मिलेनियम मेलोडीज् या ग्रुपच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक उपक्रमात त्या सक्रिय आहेत.
यावेळी संपतराव शिंदे, देवस्थान समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश जाधव, जि. प.सदस्य अर्जुन आबिटकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, अशोक अण्णा चराटी, नितीन बोटे, संभाजी जाधव, धनाजी देसाई आदी उपस्थित होते.