शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: विट्यात अल्पवयीन मुलीचा धावत्या टेम्पोत विनयभंग, तरुणास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 12:47 IST

विटा : टेम्पोतून विटा येथून कुंडलकडे जाताना एका अल्पवयीन मुलीचा टेम्पोतच विनयभंग केला. हा प्रकार शनिवारी दुपारी १२:०० वाजण्याच्या ...

विटा : टेम्पोतून विटा येथून कुंडलकडे जाताना एका अल्पवयीन मुलीचा टेम्पोतच विनयभंग केला. हा प्रकार शनिवारी दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास विटा - कुंडल रस्त्यावरील सूर्यनगर येथे घडला. याची विचारणा करण्यास गेलेल्या मुलीच्या वडिलांवरही संशयिताने कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संशयित परशुराम सिदराम होनमोरे (वय ३३, रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) यास विटा पोलिसांनी अटक केली आहे.पीडित अल्पवयीन मुलगी संशयित परशुराम होनमोरे याच्या टेम्पो (क्र. एमएच ४३ पीपी ४१६६)मधून विटा येथून कुंडलकडे जात होती. टेम्पो विटा ते कुंडल रोडवर सूर्यनगर येथे पोहचल्यानंतर संशयित परशुराम याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. तिने त्यास प्रतिकार केला.हा प्रकार तिने घरी आल्यावर वडिलांना सांगितला. त्यावेळी वडिलांनी या प्रकाराची संशयित परशुरामकडे विचारणा केली. त्यावेळी वडिलांना शिवीगाळ करून कोयता घेऊन परशुराम त्यांच्या अंगावर धावला. धमकी देत वडिलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या आईसोबत विटा पोलिस ठाण्यात संशयित परशुराम होनमोरे याच्याविरूद्ध फिर्याद दिली. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता ७५ (१), ३५२, ३५१ (२) (३) पोक्सो ८ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक जयश्री कांबळे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस