शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत मंत्री चंद्रकांत पाटील-‘शक्तिपीठ’ बाधित शेतकऱ्यांत खडाजंगी; आंदोलकांकडून शासनाचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 13:52 IST

शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन मागे  

सांगली : शक्तिपीठ महामार्ग बाधित आंदोलक आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये सांगलीत गुरुवारी तू-तू-मैं-मैंचा प्रकार घडला आहे. शेतकऱ्यांनी पाटील यांची भेट घेऊन चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, पालकमंत्री पाटील यांनी बसून नाही, उभं राहूनच चर्चा होणार, अशी भूमिका घेतली. यावेळी त्यांनी शांततेत बोला, असा दमदेखील आंदोलकांना भरला. गुरुवारी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हा सर्व प्रकार घडल्यामुळे आंदोलकही आक्रमक झाले. दरम्यान, शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे.नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे, राज्य संपर्कप्रमुख शरद पवार गव्हाण, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे, कार्याध्यक्ष भूषण गुरव, कोषाध्यक्ष विष्णू सावंत यांच्यासह शेतकऱ्यांनी गुरुवारी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी भेटीवरून संघटना प्रतिनिधी आणि पालकमंत्री पाटील यांच्यात वादावादीचे प्रकार घडले.आंदोलकांनी शेतकऱ्यांच्या मागण्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात बसून चर्चा करण्याची विनंती केली होती. यावर चंद्रकांत पाटील यांनी आत बसून नाही, इथं उभं राहूनच बोलणार, अशी दादागिरी चालणार नाही, असे सुनावले. उभं राहून बोला, मी थांबलो आहे ना येथे. पळून चाललो आहे का? असा सवालही त्यांनी आंदोलकांना केला.

शेतकऱ्यांचे अश्रू कधी दिसणार? : दिगंबर कांबळेशेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी टाहो फोडून सांगत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांनी मोर्चा काढून निषेध नोंदविला आहे. इतकं असूनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील फक्त पाच लोकांचा विरोध आहे, असे म्हणत आहेत. बाकी लोकांचे समर्थन आहे, असा दावा करीत आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू का दिसत नाहीत? हा बाधित शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.

टॅग्स :SangliसांगलीShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गchandrakant patilचंद्रकांत पाटीलagitationआंदोलनFarmerशेतकरी