किमान तापमान १८ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:39 IST2020-12-13T04:39:47+5:302020-12-13T04:39:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील कमाल व किमान तापमानात वाढ झाल्यामुळे गेली दोन दिवस थंडी गायब झाली आहे. ...

किमान तापमान १८ अंशावर
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील कमाल व किमान तापमानात वाढ झाल्यामुळे गेली दोन दिवस थंडी गायब झाली आहे. आगामी सहा दिवस तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्ह्यात शनिवारी किमान तापमान १८, तर कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. किमान तापमानात आणखी अंशाने वाढ होण्याचा अंदाज आहे. शनिवारी जिल्ह्याच्या काही भागात अंशत: ढगाळ वातावरण होते. दोन दिवस असेच वातावरण राहणार असून, त्यानंतर आकाश निरभ्र होणार आहे. कमाल व किमान तापमानात सतत चढ-उतार सुरू आहे. त्यामुळे त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. कधी कडाक्याची थंडी, कधी उकाडा, कधी ढगांची दाटी असे वातावरण गेली महिनाभर जाणवत आहे. येत्या काही दिवसांतही अशाचप्रकारच्या वातावरणाचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे.