शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीत पुस्तक प्रदर्शनात लाखोंची उलाढाल

By admin | Updated: December 19, 2014 00:27 IST

माणदेशवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : दहा हजारांवर विक्री; पहिल्यांदाच आयोजन

अविनाश बाड- आटपाडी  तालुक्यात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या मराठी पुस्तकांच्या प्रदर्शनाला माणदेशवासीयांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. अवघ्या आठ दिवसात तब्बल पाच लाखांचा आकडा पार करुन १0 हजारांहून अधिक पुस्तके प्रदर्शनात विकली केली. साने गुरुजींपासून सुमती क्षेत्रमाडेपर्यंत आणि कालिदासांपासून हरिनारायण आपटे यांच्यासह अनेक साहित्यिकांच्या कथा, कादंबऱ्या आणि नाटकांची पुस्तके अबाल-वृध्द खरेदी करत आहेत. वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, असा गळा काढणाऱ्या चिंतातुरांना माणदेशी वाचकांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेल्या ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकरराव खरात, ना. सं. इनामदार या शब्दप्रभूंची ही भूमी. कारणे काहीही असोत, आजपर्यंत येथे मराठी पुस्तकांचे प्रदर्शनच झालेले नाही. दि. १० डिसेंबरपासून आटपाडी एज्युकेशन सोसायटी येथील दिशा वाचनालय आणि साहित्य परिषदेची आटपाडी शाखा यांच्या विद्यमाने नामवंत लेखकांची पुस्तके फक्त ५० रुपयांत उपलब्ध आहेत. वाचन संस्कृती वृध्दिंगत व्हावी, यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या अजब प्रकाशन संस्थेच्या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु असलेल्या या प्रदर्शनाला दररोज ५00 ते ६00 एवढ्या संख्येने वाचक भेट देत आहेत. या प्रदर्शनात साने गुरुजींची २0 पुस्तके उपलब्ध आहेत. शालेय विद्यार्थ्यांचाही पुस्तके खरेदी करण्याकडे अधिक ओढा आहे.या प्रदर्शनात ना. सी. फडके, नाथ माधव, साने गुरुजी, लोकमान्य टिळक, चंद्रकुमार नलगे, हरी नारायण आपटे, स्वातंत्र्यवीर सावरकर, विनायक ओक, गोपाळ गोडसे, राम गणेश गडकरी, गिरीजा कीर, श्रीकांत मुंदरगी, अनंत तिबिले, नारायण धारप, सुमती क्षेत्रमाडे, माधव शास्त्री, गो. ना. दातार, बा. ग. जोशी आदी लेखकांचे ग्रंथ उपलब्ध आहेत. लोकमान्य टिळकांच्या चरित्राचे तीन खंड आणि ‘गीता रहस्य’चे दोन खंड, हे पाच ग्रंथ केवळ प्रत्येकी पन्नास रुपये याप्रमाणे अडीचशे रुपयांना उपलब्ध आहेत.‘अल्ला हू अकबर, जहर, योगेश्वर श्रीकृष्ण, नल-दमयंती, धन्य ती मुक्ताई’ या धार्मिक ग्रंथासह राजर्षी शाहू महाराज, महाराणी येसुबाई, छत्रपती शिवराय, रामकृष्ण परमहंस, अरविंद, बहिणाबार्इंची गाणी, एकच प्याला’ ते अगदी ‘पथेर पांचाली’ या बंगाली कादंबरी मराठी अनुवाद करुन या ग्रंथ प्रदर्शनात उपलब्ध केली आहे. या प्रदर्शनाला वाचकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच प्रयत्नात प्रदर्शन यशस्वी ठरले आहे.