दुधेभावी. रांजणीत अवैध व्यवसायांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:32 IST2021-01-16T04:32:04+5:302021-01-16T04:32:04+5:30

दुधेभावी येथे बस स्थानकाजवळ असलेल्या किराणा दुकानाच्या अडोशाला अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्या राजाराम शिवाजी कोळेकर (वय २८, रा. ...

Milky. Raids on illegal businesses in Ranjani | दुधेभावी. रांजणीत अवैध व्यवसायांवर छापे

दुधेभावी. रांजणीत अवैध व्यवसायांवर छापे

दुधेभावी येथे बस स्थानकाजवळ असलेल्या किराणा दुकानाच्या अडोशाला अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्या राजाराम शिवाजी कोळेकर (वय २८, रा. दुधेभावी) याला कवठेमहांकाळ पोलिसांनी छापा टाकून अटक केलीे. त्याच्याकडून ४८० रुपये किमतीच्या देशी दारूच्या १२ बाटल्या जप्त केल्या. या घटनेची फिर्याद पोलीस नाईक सुहास चव्हाण यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे.

रांजणी येथे पानपट्टीच्या अडोशास जुगार व्यवसाय सुरू असल्याचे समजताच कवठेमहांकाळ पोलिसांनी छापा टाकून जुगार अड्डा चालविणारा भाग्यवंत नामदेव लोंढे (रा. रांजणी) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून जुगाराचे साहित्य व राेख २६६० रुपये व इतर साहित्य असा २६६२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत फिर्याद पोलीस नाईक अण्णासाहेब नानासाहेब भोसले यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार भाग्यवंत लोंढे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Milky. Raids on illegal businesses in Ranjani