शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
2
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
3
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
4
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
5
काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन
6
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
7
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
8
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
9
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
10
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
11
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला
12
Share Market मध्ये रिकव्हरी; फार्मा, आयटी, बँक इंडेक्समुळे तेजी; TATA Motors आपटला
13
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
14
RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले
15
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
16
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
17
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
18
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
19
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
20
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले

एका शुन्याने अडविले हजारो शेतकऱ्यांचे दुधाचे अनुदान, बँक खाते क्रमांकातील गोंधळामुळे लाखो रुपये अडकले

By संतोष भिसे | Published: April 28, 2024 3:52 PM

ऑनलाइन चुकांचे अनेक अडथळे पार करताकरता शेतकऱ्यांची पुरती दमछाक होत आहे. अनुदानासाठी दूध उत्पादकांची, उत्पादनाची माहिती संकेतस्थळावर भरावी लागते.

देवराष्ट्रे : गाईच्या दुधाचे प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान एका शुन्यामुळे अडल्याचा प्रकार घडला आहे. अनुदानासाठी अर्ज भरताना एक्सेल शिटमध्ये बॅंक खात्यातील शून्य नोंदविता आले नाही, त्यामुळे हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. 

ऑनलाइन चुकांचे अनेक अडथळे पार करताकरता शेतकऱ्यांची पुरती दमछाक होत आहे. अनुदानासाठी दूध उत्पादकांची, उत्पादनाची माहिती संकेतस्थळावर भरावी लागते. त्यामध्ये आधार कार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक, जनावराचा टॅगिंग क्रमांक आदी माहिती एक्सेल शीटमध्ये भरून शासनाकडे पाठवावी लागते. डेअरी चालकांनी ही माहिती शासनाकडे तपासणीसाठी पाठवली, मात्र त्यातील अनेक शेतकऱ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी निघाल्या आहेत. ज्या दूध उत्पादकाचा बॅंक खाते क्रमांक शुन्याने सुरु होतो, त्यांचे प्रस्ताव लटकले आहेत. एक्सेल शीटमध्ये सुरुवातीला शून्य नोंदवता आले नाही. जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याच्या माहितीमध्ये शून्य लिहायचा राहून गेला आहे. त्यामुळे हजारो उत्पादकांची अनुदानाची माहिती एका शून्यामुळे अडकून पडली आहे.

प्रस्तावामध्ये जनावरांचे टॅगिंग क्रमांक, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक यातील अनेक चुकांची दुरुस्ती त्या-त्यावेळी करण्यात आली, पण या शुन्याचा निकाल कसा लावायचा? याचे कोडे डेअरी चालकांना आणि शेतकऱ्यांना सुटलेले नाही. त्यामुळे त्यांना अनुदान मिळण्यात अडचणी येत आहेत. 

संगणक शून्य घेईनाएक्सेलमध्ये माहिती भरताना संगणक सुरुवातीला शून्य घेत नसल्याचे अनुभव आहेत. पण बॅंकांचे खाते क्रमांक शुन्याने सुरु होत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. शून्य नसल्याने खाते क्रमांक सदोष दिसून येते, परिणामी अनेकांच्या अनुदानाच्या रकमा खात्यांवर जमा झालेल्या नाहीत. 

दुरुस्तीची कार्यवाहीयासंदर्भात संबंधित अधिकारी गोपाळ करे यांनी सांगितले की, शुन्याने सुरु होणाऱ्या बॅंक खाते क्रमांकाची दुरुस्ती करण्याची कार्यवाही सुरु आहे. अपूर्ण दिसणारे खाते क्रमांक लवकरच दुरुस्त होतील, त्यानंतर अनुदानाच्या रकमा दूध उत्पादकांच्या खात्यांवर जमा होतील.

टॅग्स :SangliसांगलीMONEYपैसा