Join us  

RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 3:39 PM

Open in App
1 / 8

कोलकाता नाईट रायडर्सने १८ गुणांसह प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. त्यांनी उर्वरित दोन सामन्यांत गुजरात टायटन्स ( १३ मे ) व राजस्थान रॉयल्स ( १९ मे) यांचा सामना करायचा आहे आणि हे दोन्ही सामने गमावले तरी त्यांचे प्ले ऑफमधील स्थान पक्के राहील.

2 / 8

राजस्थान रॉयल्सनला मागील तीन सामन्यांत हार पत्करावी लागली आहे, परंतु १२ सामन्यांत ८ विजयांसह ते १६ गुण कमवून दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना उर्वरित दोन सामन्यांत ( वि. पंजाब व वि. कोलकाता) एक विजय प्ले ऑफमधील स्थान पक्के करण्यासाठी पुरेसा आहे. दोन्ही सामन्यांत हार पत्करूनही ते पात्र ठरू शकतात. पण, त्यासाठी सनरायझर्स हैदराबादचा गुजरात किंवा पंजाब यांच्याविरुद्ध पराभव होणे गरजेचे आहे. शिवाय लखनौचा नेट रन रेट हा राजस्थानपेक्षा कमी असायला हवा.

3 / 8

चेन्नई सुपर किंग्सने नवा कर्णधार ऋतुराज गायकवाच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली आहे. १३ सामन्यांत ७ विजय मिळवून ते १४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत आणि त्यांनी प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या आहेत. त्यांच्यासाठी १८ मे रोजी बंगळुरुविरुद्धचा सामना हा नॉक आऊट सामना असेल. हा सामना जिंकला तर ते प्ले ऑफ खेळतील, पण जरी ते हरले तरी त्यांना नेट रन रेटच्या जोरावर आगेकूच करता येईल.

4 / 8

सनरायझर्स हैदराबादचा संघ १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत आणि १६ व १९ मे रोजी त्यांना अनुक्रमे गुजरात टायटन्स व पंजाब किंग्स यांचा सामना करायचा आहे. त्यांना दोन्ही सामने जिंकून प्ले ऑफमध्ये पोहोचता येईल किंवा त्यांनी गुजरातविरुद्ध बाजी मारली तरी ते चौथ्या क्रमांकासह प्ले ऑफसाठी पात्र ठरेल.

5 / 8

लखनौ सुपर जायंट्स ( -०.७६९) १२ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. नेट रन रेट ही त्यांच्यासमोरील मोठी अडचण आहे. हैदराबादविरुद्धचा झालेला मानहानीकारक पराभव याचा त्यांना फटका बसला आहे. त्यांना १४ मे रोजी दिल्ली कॅपिटल्स व १७ मे रोजी मुंबई इंडियन्सचा सामना करायचा आहे. त्यांना या दोन्ही लढती जिंकाव्या लागतील आणि १६ गुणांसह ते पात्र ठरू शकतात.

6 / 8

दिल्ली कॅपिटल्सला काल बंगळुरुविरुद्धच्या पराभवाचा मोठा फटका बसला आहे. उर्वरित एक सामन्यात त्यांना लखनौ सुपर जायंट्सचा सामना करायचा आहे. तो सामना जिंकून त्यांचे १४ गुण होताली, तरीही त्यांचे प्ले ऑफचे स्थान पक्के होणार नाही. त्यांना लखनौ व बंगळुरू यांच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल. त्यामुळे DC vs LSG हा नॉक आऊट सामना असेल.

7 / 8

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( ०.३७८) सलग पाच विजय मिळवून पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यामुळे CSK विरुद्धचा सामना हा त्यांच्यासाठी नॉक आऊट असेल. पण, तो सामना जिंकूनही RCB चे स्थान पक्के नसेल. त्यांना CSK ( ०.५२८) पेक्षा चांगला नेट रन रेट ठेवयाचा असेल तर त्यांना हा सामना १८ धावांनी किंवा १८ षटकांच्या आत जिंकावा लागेल.

8 / 8

गुजरात टायनटन्स १२ सामन्यांत १० गुणांसह शर्यतीत आहे. त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. त्यांना कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना करावा लागणार आहे. हे सामने जिंकूनही त्यांचे १४ गुण होतील, परंतु नेट रन रेटवर त्यांचे गणित असेल.

टॅग्स :आयपीएल २०२४रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्स