शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
4
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
5
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
6
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
7
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
8
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
9
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
10
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
11
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
12
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
13
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
14
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
15
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
16
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
17
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
18
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
19
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला

सांगली जिल्ह्यात दुधाचे उत्पादन लाख लीटरने वाढले, मात्र..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 18:31 IST

चारा उपलब्ध झाल्याचा परिणाम : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले, उत्पन्न घटले

सदानंद औंधेमिरज : मे महिन्यापासून जिल्ह्यात चांगला पाऊस सुरू झाल्यामुळे मुबलक ओला चारा उपलब्ध झाला आहे. चारा व पाणी उपलब्ध झाल्याने जिल्ह्यात दररोज दूध उत्पादनात एक लाख लीटरने वाढ झाली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात दुधाचे उत्पादन वाढले आहे. पण, गायी-म्हशींच्या दूध दरात मात्र काही प्रमाणात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे.जिल्ह्यात दररोज सरासरी १५ लाख लीटर दूध उत्पादन होते. यापैकी ५० टक्के पिशवीबंद दुधाची विक्री होते. उर्वरित दुधाची राज्यात मोठ्या शहरात निर्यातीसह दूध पावडर व बटर या दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी वापर होतो. पावसाळ्याच्या चार महिन्यांत हिरवा चारा उपलब्ध असल्याने १० ते १५ टक्के दूध उत्पादनात वाढ होते. हा दुधासाठी पृष्ठकाळ मानला जातो. यावर्षीही उन्हाळ्यात घटलेले दूध उत्पादन जून महिन्यात वाढल्याचे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होते. यावर्षी मार्चमध्ये एप्रिल महिन्यात १५ लाख लीटर दैनंदिन दूध उत्पादन होते. उन्हाळ्यात पाणी व चारा टंचाईमुळे मे महिन्यात १४ लाख लीटर दूध संकलन होत होते. जून महिन्यात पाऊस सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात ओला चारा मुबलक उपलब्ध झाल्यामुळे दररोज १५ लाख ६३ हजार सरासरी दूध उत्पादन होत आहे. जिल्ह्यातील दैनंदिन दूध उत्पादनापैकी ६० टक्के गायीचे दूध आहे. जिल्ह्यात नदीकाठावरील चार तालुक्यांत मोठ्या संख्येने दुभती जनावरे व दुधाचा व्यवसाय आहे. जिल्ह्यात चितळे, थोटे आदी १२ खासगी दूध डेअरी, १७ मल्टीस्टेट दूध संघ दूध संकलन करत आहेत. खासगी डेअरींचे दररोज नऊ लाख लीटर दूध संकलन असून, त्यापैकी एकट्या चितळे डेअरीचे जिल्ह्यात दररोज आठ लाख लीटर संकलन आहे. यानंतर सहकारी दूध संघासह अन्य खासगी डेअरींचा नंबर लागत आहे.जिल्ह्यातील दूध उत्पादन

  • एप्रिल - १५ लाख २७ हजार
  • मे - १४ लाख ४८ हजार
  • जून - १५ लाख ६३ हजार 

दूध खरेदी दर

  • गाय - ३० रुपये
  • म्हैस - ४९.५० रुपये

जून, जुलै महिन्यात हिरवा चारा उपलब्ध असल्याने दूध उत्पादनात वाढ होते. जिल्ह्यात दैनंदिन दूध उत्पादनाचा वापर उपपदार्थ निर्मिती व पुणे, मुंबई या शहरांत निर्यातीसाठी होतो. दुधाला दर चांगला असल्याने गायीच्या दुधाला लीटरला पाच रुपये अनुदानाची शासकीय योजना बंद झाली आहे. - गोपाल कारे, दुग्धविकास प्रशासन अधिकारी, शासकीय दूध डेअरी, मिरज.