शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील पावणेदोन लाख विद्यार्थ्यांचे मध्यान्ह भोजनच झाले बंद, प्रशासन गांभीर्याने कधी लक्ष देणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 15:22 IST

डिसेंबर, जानेवारी महिन्यासाठी मंजूर तांदळापैकी ६६९ टन तांदूळ मिळावा, अशी शासनाकडे मागणी

सांगली : शासनाकडून पुरेसा तांदूळ मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील एक लाख ७० हजार १८५ विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची हेळसांड चालू आहे. सध्या तांदूळच नसल्यामुळे ५० टक्के शाळांमधील मध्यान्ह भोजनच बंद झाल्यामुळे गरीब कुटुंबातील मुलांची उपासमार सुरू झाली आहे. याकडे प्रशासन गांभीर्याने कधी लक्ष देणार आहे, असा सवाल शिक्षकांमधून उपस्थित होत आहे.डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या दोन महिन्यांसाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक हजार ७३०.३५ टन तांदळाची गरज होती. तशी मागणीही जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून शासनाकडे केली होती. यापैकी शासनाने एक हजार ६१.१८२ टन तांदूळ मंजूर केला. प्रत्यक्षात ६६१ टनच तांदूळ जिल्ह्याला मिळाला असून, ४०० टन तांदूळ मिळालाच नाही. डिसेंबर, जानेवारी महिन्यासाठी मंजूर तांदळापैकी ६६९ टन तांदूळ मिळावा, अशी शासनाकडे मागणी केली होती.

यापैकी बुधवार, दि. २५ रोजी २४० टन तांदूळ मिळाला आहे. पोषण आहारासाठी तांदूळच मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के शाळांमधील विद्यार्थ्यांचे मध्यान्ह भोजनच बंद आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाकडील लेखाधिकारी यांच्याकडे विचारले असता, शासनाकडूनच तांदूळ मिळत नसल्यामुळे पुरवठ्यात अडचणी येत असल्याचे सांगितले.फेब्रुवारी, मार्चसाठी १७३० टन तांदूळ हवाजिल्ह्यातील एक लाख ७० हजार १८५ विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी फेब्रुवारी, मार्च २०२३ या दोन महिन्यांसाठी एक हजार ७३० टन तांदळाची शिक्षण विभागाने शासनाकडे मागणी केली आहे. परंतु, शासनाने डिसेंबर, जानेवारी महिन्याचेच पूर्ण तांदूळ दिला नाही. यामुळे फेब्रुवारी, मार्च या दोन महिन्यांचा तांदूळ तरी वेळेत मिळणार का?, असा जि. प. प्रशासनाला प्रश्न पडला आहे.महापालिका क्षेत्रात २० दिवसांपासून बंदमहापालिका क्षेत्रातील शाळांना गेल्या २० दिवसांपासून तांदूळ मिळालेला नाही. यामुळे जिल्हा परिषद, महापालिका आणि खासगी अनुदानातील शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन गेल्या २० दिवसांपासून मिळत नाही. याबाबत सध्या पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पालकांच्या तक्रारीने शिक्षक हैराण झाले आहेत.जिल्ह्याची अशी आहे परिस्थिती

  • मध्यान्ह भोजनाचे विद्यार्थी : १७०१८५
  • दोन महिन्यांसाठी लागणारा तांदूळ : १७३० टन
  • शासनाकडून मंजूर : १०६१.१६२
  • प्रत्यक्षात मिळाला : ९०१
टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळाStudentविद्यार्थी