संख येथे म्हैत्रेच्या घराची झडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:20 IST2021-06-25T04:20:26+5:302021-06-25T04:20:26+5:30
फोटो ओळ : संख (ता. जत) येथे गुरुवारी अप्पर तहसीलदार हणमंत म्हैत्रे याच्या घराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी झडती ...

संख येथे म्हैत्रेच्या घराची झडती
फोटो ओळ : संख (ता. जत) येथे गुरुवारी अप्पर तहसीलदार हणमंत म्हैत्रे याच्या घराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : संख (ता. जत) येथील अप्पर तहसीलदार हणमंत म्हैत्रे याच्या येथील निवासस्थानाची सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी झडती घेतली. सायंकाळी ५ वाजता ही कारवाई करण्यात आली.
हणमंत म्हेत्रे (वय ४६, मूळ गाव रा. मणेराजुरी) व तलाठी विशाल उदगिरे (वय ३६, रा. माडग्याळ सजा) यांनी माती वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडून तो कारवाई न करता सोडण्याच्या कामी दोन लाख ३० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.
त्या संदर्भात तलाठी विशाल उदगेरी यांना मंगळवारी ताब्यात घेण्यात आले होते.
बुधवारी दुपारी तहसीलदार हणमंत म्हेत्रे सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात स्वतःहून हजर झाला. दोघांनाही दोन दिवस पोलीस कोठडी मिळाली.
मंगळवारी रात्री लाचलुचपत विभागाने त्यांचे निवासस्थान सील केले होते. गुरुवारी लाचलुचपत विभागाचे अधिकारी हणमंत म्हैत्रेला घेऊन संख येथे सायंकाळी पाच वाजता हजर झाले. त्यांनी निवासस्थानाची सुमारे तासभर झडती घेतली.
पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, सहायक पोलीस फौजदार भास्कर भोरे, रवींद्र धुमाळ, धनंजय खाडे, अविनाश सागर यांचा कारवाईत सहभाग होता. कारवाईबाबत अधिक माहिती देण्यात आली नाही; पण ताब्यात घेतलेली माहिती न्यायालयात सादर करणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे यांनी सांगितले.