शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हैसाळ’च्या पाण्यावरून कलगीतुरा रंगला

By admin | Updated: March 14, 2016 00:07 IST

अनेक भागात पाणी पोहोचलेच नाही : दुजाभाव होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

 सांगली : म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांकडून होत असलेली मागणी आणि त्याकडे शासनाचे होत असलेले दुर्लक्ष, या पार्श्वभूमीवर अखेर शेतकऱ्यांनी व साखर कारखान्यांनी भरलेल्या रकमेतून पाणी सुरु झाले असले तरी, पाण्याच्या लाभावरुन गावा-गावांत चांगलाच संघर्ष पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून आवर्तनाचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात झालेली दिरंगाई व शेतकऱ्यांकडून काही विशिष्ट भागालाच पाणी सोडले जात असल्याच्या आरोपामुळे शेतकऱ्यांत असंतोष दिसत असून, म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांना समान पाणी मिळावे, अशी मागणी जोर धरत आहे. यावर्षी प्रथमच म्हैसाळच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्याच्या मागणीसाठी तीव्र स्वरुपाचा संघर्ष करावा लागला. यापूर्वी शेतकऱ्यांच्या मागणीअगोदरच काहीवेळा आवर्तने सुरु झाल्याची उदाहरणे आहेत. मात्र, थकबाकी भरावी, या मुद्यावर शासनाने घेतलेली ठाम भूमिका व शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या अत्यल्प प्रतिसादामुळे अपेक्षित वेळेपेक्षा उशिरा आवर्तन सुरु झाले. यातही साखर कारखान्यांनी महत्त्वाची भूमिका घेत थकबाकी भरण्यास मदत केल्यानेच आवर्तन सुरु होऊ शकले. आवर्तन सुरु होऊन त्याचा वापर सुरु झाला असतानाच, आता मुख्य कालव्यांर्तगत येणारे शाखा कालवे व पोटकालव्यांना पाणी सोडण्यावरुन शेतकऱ्यांतच संघर्ष होताना दिसत आहे. प्रशासनाने सर्वप्रथम मुख्य कालव्यातून संपूर्ण लाभक्षेत्रात पाणी सोडण्याचे नियोजन केले असून त्यासाठी कोठेही सायफन पध्दतीने अथवा इतर मार्गाने पाणी उचलण्यास मनाई केली होती. यातूनच आरग येथे कालवा अडवून तलावात पाणी सोडण्याचा प्रयत्न झाल्याने प्रशासनाने कालव्यावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. आता म्हैसाळच्या लाभक्षेत्रातील खंडेराजुरी शाखा कालव्यातून व कळंबी शाखा कालव्यातून पाणी सोडण्यात आले असले तरी, आवर्तन सुरु होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर पाणी सोडण्यात आल्याने आमची पिके जळून गेल्यानंतर पाणी सोडल्याचा आरोप या भागातील शेतकरी करीत आहेत. थकबाकी वसुलीस प्रतिसाद देणाऱ्या मालगाव भागात कळंबी शाखा कालव्यातून पाणी पोहोचत असले तरी, या कालव्यातून दोन दिवसापूर्वी पाणी सोडण्यात आले आहे. खंडेराजुरी शाखा कालव्यात झुडपे वाढल्याने पाण्यास अडथळा निर्माण होत असून शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचण्यास अडचणी निर्माण होत आहेत. शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीची वसुली होताना ती पूर्णवेळची होणार आणि त्याचा लाभ मात्र पंधरा दिवस उशिरा मिळत असल्यानेच शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हीच अवस्था पोटकालव्यांची असून अनेक भागात वारेमाप पाणी सोडण्यात आले असून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असताना, खरी पाण्याची गरज असणारा भाग मात्र वंचित राहत आहे. यात राजकीय दबावामुळे प्रशासन नामोहरम झाल्याचेच दिसून येत आहे. प्रशासनाने आता पोटकालवे आणि शाखा कालव्यांची पाहणी करुन नियोजनाची गरज असताना, असे होत नसल्यानेच शेतकऱ्यांत असंतोष निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)पाण्याचे नियोजन करा, अन्यथा आंदोलन छेडणारपाण्याचे नियोजन योग्य होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी असून प्रशासनाने तातडीने पाण्याचे नियोजन करावे. म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांचा लवकरच दौरा करुन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणार आहे. कोणताही गट-तट न पाहता सर्व भागाला पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रशासनाने तातडीने पाण्यापासून वंचित भागाला पाणी सोडण्याचे नियोजन करावे. प्रसंगी प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मिरज पंचायत समितीचे सभापती जयश्री पाटील यांनी दिला.हजारो लिटर पाण्याची नासाडीयोजनेच्या पोटकालव्यातून सोडण्यात आलेले पाणी त्या भागातील शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झाल्यानंतर बंद होणे गरजेचे असताना, पाणी सुरुच राहिल्याने विनावापर हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मिरज पूर्व भागातील अनेक गावांत रस्त्याच्या कडेने असे पाणी वाया जाताना दिसून येत आहे.