भिलवडी इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST2021-08-18T04:32:56+5:302021-08-18T04:32:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँनड हायस्कूलमध्ये सामाजिक कार्यकर्ते नितीन ...

भिलवडी इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँनड हायस्कूलमध्ये सामाजिक कार्यकर्ते नितीन गुरव यांच्या हस्ते व संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या अध्यक्षतेखाली दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
परिमल कदम, पारस पाटील, विनीत चौगुले यांच्यासह शाळेच्या पहिल्या बॅचची विद्यार्थिनी गायत्री गिरीश चितळे हिचा उच्च शिक्षणासाठी स्वीडन येथे जात असल्याने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव संजय कुलकर्णी, डॉ. सुनील वाळवेकर, विभाग प्रमुख के. डी. पाटील, मानसिंग हाके, संचालक व्यंकोजी जाधव, लीना चितळे, स्मिता माने, सुचेता कुलकर्णी आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापिका विद्या टोणपे यांनी प्रास्ताविक केले. उषा हजारे यांनी स्वागत केले. अश्विनी महिंद यांनी सूत्रसंचालन केले, तर हर्षला पवार-पाटील यांनी आभार मानले.