शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील ऊस दराची कोंडी आज तरी फुटणार?, जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिनिधींची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 16:23 IST

सांगली : ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी मंगळवारची बैठक रद्द झाली आहे. प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बुधवार दि. २७ ...

सांगली : ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी मंगळवारची बैठक रद्द झाली आहे. प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बुधवार दि. २७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलविली आहे. या बैठकीमध्ये ऊस दराची कोंडी फुटण्याची शक्यता आहे.आठ दिवसांपूर्वी ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य संघटनांचे प्रतिनिधी, साखर कारखानदारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदारांना अंतिम प्रस्ताव दिला. या प्रस्तावांमध्ये गतवर्षीचा साखर उतारा साडेबारा टक्केपेक्षा अधिक असल्यास पहिली उचल तीन हजार २५० रुपये, साडेबारा पेक्षा कमी असल्यास तीन हजार २०० आणि ज्या कारखान्यांचा साखर उतारा दहा टक्के आहे त्या कारखान्यांनी ३ हजार १०० रुपये असा शेवटचा प्रस्ताव ठेवण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील कारखानदारांनी गतवर्षी तुटलेल्या उसापोटी तीन हजार रुपयांपेक्षा जास्त दर दिला आहे, त्यांनी ५० रुपये व ज्या कारखान्यांनी ३००० च्या आत दिला आहे, त्यांच्याकडून शंभर रुपये देण्याचा प्रस्ताव मान्य केला. पण, चालू गळीत हंगामातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या प्रस्तावांवर विचार करून निर्णय घेण्याचे साखर कारखानदारांनी सांगितले होते. त्यानुसार दि. २६ डिसेंबरला पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्याचे ठरले होते. पण, दि. २६ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी रजेवर गेले आहेत. म्हणून मंगळवारची बैठक रद्द झाली. बुधवार दि. २७ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी साखर कारखानदार आणि संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलविली आहे. या बैठकीत ऊस दराची कोंडी फुटेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

टॅग्स :SangliसांगलीsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखानेcollectorजिल्हाधिकारी