मिरजेत पादत्राणे विक्रेत्यांचा मेळावा व प्रदर्शनास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:29 IST2021-03-01T04:29:14+5:302021-03-01T04:29:14+5:30

आघाडीच्या कंपन्यांच्या पादत्राणांचे वितरक मिरा एंटरप्रायझेसतर्फे विक्रेत्यांचा मेळावा व विविध कंपन्यांच्या पादत्राणांचे प्रदर्शन पार पडले. आमदार सुरेश खाडे यांच्याहस्ते ...

Meeting of Miraj footwear sellers and response to the exhibition | मिरजेत पादत्राणे विक्रेत्यांचा मेळावा व प्रदर्शनास प्रतिसाद

मिरजेत पादत्राणे विक्रेत्यांचा मेळावा व प्रदर्शनास प्रतिसाद

आघाडीच्या कंपन्यांच्या पादत्राणांचे वितरक मिरा एंटरप्रायझेसतर्फे विक्रेत्यांचा मेळावा व विविध कंपन्यांच्या पादत्राणांचे प्रदर्शन पार पडले. आमदार सुरेश खाडे यांच्याहस्ते संत रोहिदास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. छाया, गणेश (मिरज), रेखा, सहारा, आलिशान (कुडची), संतोष (अंकली), विजय, रेणुका (विटा), उमा (जत), चरणसेवा, इंडिया (फलटण), या किरकोळ विक्रेत्यांना प्रोत्साहनपर बक्षिसाचा धनादेश देण्यात आला. यावेळी ज्युनिअर अमिताभ (शशिकांत पेडवाल) व ज्युनिअर जाॅनी लिव्हर (रामेश्वर महाजन) यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले.

काैन बनेगा करोडपती या कार्यक्रमात आमदार खाडे यांनी ज्युनिअर अमिताभ यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मिरा एंटरप्रायझेसच्या संचालक सुरक्षा धामेजा व संचालक रवी धामेजा यांनी स्वागत केले. धनंजय जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, मनीष ठाकूर, मनोहर कुरणे, अनिल अग्रवाल, दत्तात्रय गोरे, अशोक तुलसानी, अब्दुल अंसारी, अल्ताफ खतीब यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. निवास पवार यांनी संयोजन केले.

Web Title: Meeting of Miraj footwear sellers and response to the exhibition