आशा होमिओपॅथी ‘टीम’कडून आयुष्यमंत्र्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:25 IST2021-04-10T04:25:52+5:302021-04-10T04:25:52+5:30

ओळ : आशा होमिओपॅथीचे डॉ. बी. एस. भोसले यांनी सहकाऱ्यांसह गोवा येथे केंद्रीय आयुष्यमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेतली. ...

Meeting of Life Minister from Asha Homeopathy ‘Team’ | आशा होमिओपॅथी ‘टीम’कडून आयुष्यमंत्र्यांची भेट

आशा होमिओपॅथी ‘टीम’कडून आयुष्यमंत्र्यांची भेट

ओळ : आशा होमिओपॅथीचे डॉ. बी. एस. भोसले यांनी सहकाऱ्यांसह गोवा येथे केंद्रीय आयुष्यमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेतली.

मिरज : कोरोना काळात होमिओपॅथी उपचार पद्धती प्रभावी ठरत असल्याने आता होमिओपॅथी उपचार पद्धत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय आयुष्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. मिरजेतील होमिओपथीतज्ज्ञ डाॅ. बी. एस. भोसले व सहकाऱ्यांनी मंत्री नाईक यांची भेट घेतली.

मंत्री नाईक यांच्या गाडीला अपघात होऊन अपघातात ते स्वत: गंभीर जखमी झाले. त्यांची पत्नी व स्वीय सहायकाचा मृत्यू झाला. आशा ग्रुप ऑफ होमिओपॅथीचे संचालक डॉ. बी. एस. भोसले व सहकाऱ्यांनी मंत्री नाईक यांच्या गोव्यातील निवासस्थानी त्यांची सांत्वनपर भेट घेतली.

डॉ. भोसले यांनी मंत्री नाईक यांच्या प्रकृतीची विचारपूस करून आरोग्याची काळजी घेण्याची विनंती केली. देशात पुन्हा नव्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांबाबत मंत्री नाईक यांनी चिंता व्यक्त करून कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी प्रभावी उपचार असलेले होमिओपॅथी उपचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. दुःखद प्रसंगातही देशाची काळजी करणारे मंत्री नाईक यांनी आशा होमिओपॅथीच्या पथकाला प्रभावित केले. यावेळी डॉ. प्रवीण पाटील, डॉ. सौ. शैली शर्मा-भोसले, डॉ. अर्चना पाटील, डॉ. गुरुदास नाईक, डॉ. प्रिया कामत उपस्थित होते.

Web Title: Meeting of Life Minister from Asha Homeopathy ‘Team’