शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बिअरमधून विष पाजून ‘त्या’ महिलेचा खून, कॉल डिटेल्सवरून लागला खूनाचा छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 14:15 IST

तिच्याकडून वारंवार होणारा अपमान आणि त्रासाला कंटाळून बिअरमधून विषारी द्रव्य पाजून तिचा खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

आटपाडी : शहरातील विद्यानगर येथील मीना बाळासाहेब जावीर (वय ३८) या महिलेच्या मृत्यूचा गुंता सोडविण्यास आटपाडी पोलिसांना दीड महिन्यांनी यश आले आहे. तिच्याकडून वारंवार होणारा अपमान आणि त्रासाला कंटाळून बिअरमधून विषारी द्रव्य पाजून तिचा खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी राजेंद्र बबन पांढरे (वय ३३, रा. गोटेवाडी ता. तासगाव), हर्षदा शिवाजी लांडगे (२०, रा. साठेनगर, आटपाडी) व योजना दत्तात्रय पाटील (३२, रा. विद्यानगर, आटपाडी) यांना अटक करण्यात आली आहे.मृत मीना जावीर खासगी कंपनीत मार्केटिंगचे काम करत होती. याच कंपनीत संशयित रवींद्र पांढरे, हर्षदा लांडगे, योजना पाटील काम करत होते. मीना ही रवींद्रकडे वारंवार पैशांची मागणी करत होती. पैसे दिले नाहीत तर बदनाम करण्याची धमकी देत होती. यामुळे रवींद्रच्या मनात तिच्याबद्दल राग होता, तर हर्षदा आणि योजना या दोघींनाही कंपनीतील कामावेळी मीना वारंवार अपमान करून बोलत होती. यातूनच तिघांनी संगनमत करून तिचा काटा काढायचे ठरविले.त्यानुसार २४ जून रोजी रवींद्रने तासगाव येथील कंपनीच्या कार्यालयात बिअरमधून विषारी द्रव्य देऊन तिला संपविण्याचा कट रचला. त्यानुसार त्याने सोबत आणलेली विषारी द्रव्याची बाटली हर्षदाला दिली. २७ जूनरोजी रात्री साडेदहाच्या सुमारास हर्षदा व योजना या दोघी मीनाच्या घरी गेल्या व त्यांनी तिला बिअरमध्ये विषारी द्रव्य मिसळूून पिण्यास दिले. बियर पिल्यानंतर ती मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर त्या तिथून निघून गेल्या.

कॉल डिटेल्सवरून छडा

मीनाच्या मृत्यूनंतर तिच्या भावाने आटपाडी पोलिसात फिर्याद दाखल केली होती. मात्र, पोलिसांना याबाबत शंका असल्याने त्यांनी तपास करत त्यावेळचे कॉल डिटेल्स, घटनास्थळावरील पंचनामा करून तिघांना गजाआड केले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी