नमराह कोविड सेंटरला औषधे भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:29 IST2021-05-27T04:29:25+5:302021-05-27T04:29:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : येथील कोरोना रुग्ण साहाय्य व समन्वय समितीच्या वतीने नमराह फाउंडेशनच्या कोविड केअर सेंटरला औषधे ...

Medicine visit to Namarah Kovid Center | नमराह कोविड सेंटरला औषधे भेट

नमराह कोविड सेंटरला औषधे भेट

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : येथील कोरोना रुग्ण साहाय्य व समन्वय समितीच्या वतीने नमराह फाउंडेशनच्या कोविड केअर सेंटरला औषधे भेट देण्यात आली. कोरोना रुग्ण साहाय्य समितीने औषध बँक संकल्पना सुरू केली आहे. या औषध बँकेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी समितीकडे कोरोनावरील औषधे जमा केली आहेत. त्यातून समितीच्या वतीने बुधवारी नमराह फाउंडेशनच्या कोविड सेंटरला अकरा हजारांच्या फॅमिफ्लू गोळ्या देण्यात आल्या. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या उपस्थितीत औषधांचा साठा सुपुर्द करण्यात आला. यावेळी समितीचे सतीश साखळकर, नगरसेवक संतोष पाटील, आयुष सेवाभावी संस्थेचे अमोल पाटील, रहीम मुल्ला, जावेद नायकवडी, डॉ.राऊफ मुल्ला, इर्शाद सोलापुरे, मुन्ना पट्टीकरी, इब्राहिम मुलानी, रफिक ऐनापुरे, मोहम्मद शेख, अमोल हणबर उपस्थित होते.

Web Title: Medicine visit to Namarah Kovid Center