जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूरकडून कोविड रुग्णांना जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST2021-06-16T04:35:11+5:302021-06-16T04:35:11+5:30

इस्लामपूर : कोरोना रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतात. त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना उपचाराच्या काळात जेवणाचे डबे पोहोच करून जायंट्‌स ...

Meals to Kovid patients from Giants Group of Islampur | जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूरकडून कोविड रुग्णांना जेवण

जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूरकडून कोविड रुग्णांना जेवण

इस्लामपूर : कोरोना रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतात. त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना उपचाराच्या काळात जेवणाचे डबे पोहोच करून जायंट्‌स ग्रुप ऑफ इस्लामपूर यांनी सामाजिक बांधिलकी जपली. दि. १५ जूनपर्यंत एकूण ८०० जेवणाच्या डब्यांचे वाटप करून समाजापुढे आदर्श मांडला.

मार्च-एप्रिल महिन्यात इस्लामपूर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली. या काळात पूर्णत: लॉकडाऊन होते. यामुळे रुग्णांना व नातेवाईकांना जेवणाची गैरसोय होत होती. यामध्ये परगावच्या रुग्णांचे हाल झाले. हीच गरज ओळखून जायंट्‌समार्फत युनिट डायरेक्टर राजकुमार ओसवाल व अध्यक्ष दुष्यंत राजमाने यांच्या पुढाकाराने जेवणाच्या डब्यांचा उपक्रम सुरू केला. या उपक्रमात मिलिंद जाधव, नितीन पारेख, डॉ. जवाहर शहा, डॉ. सदानंद जोशी, सतीश शेटे, अ‍ॅड. किरण पाटील, ईश्वरभाई पटेल, प्रतीक शहा यांनी आर्थिक मदत केली.

Web Title: Meals to Kovid patients from Giants Group of Islampur