शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election 2026: महापौर भाजपचाच, शिंदेसेनेचे दोन नगरसेवक येणार - चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 20:29 IST

एकनाथ शिंदे युतीबाबत सकारात्मक

सांगली : महापालिकेत सत्ता स्थापनेबाबत अनपेक्षित स्थिती निर्माण झाली आहे. भाजपला काठावरचे बहुमत मिळाले. शिंदेसेनेचे दोन नगरसेवकांना सोबत घेण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर चर्चा सुरू आहे, त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सांगलीत भाजपचाच महापौर होईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.महापालिका निवडणूक निकाल नंतर मंत्री पाटील प्रथमच सांगलीत आले होते. भाजपच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या निवासस्थानी भेट देत विजयी नगरसेवकांची चर्चा केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मालेगाव वगळता इतर सर्व महापालिका महायुतीचा महापौर होईल, असे सांगितले होते. जवळपास तशीच तिथे राज्यात सध्या आहे. त्यातील बहुतांश महापौर हे भाजपचे असतील. सांगलीत मात्र अनपेक्षित स्थिती निर्माण झाली आहे. भाजपला ३९ जागा मिळाल्या. बहुमतासाठी एक जागा आवश्यक आहे. शिंदेसेनेचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांना सोबत घेण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा सुरू आहे. तेही सकारात्मक आहेत. महापौर निवडीला अजून वेळ आहे. २२ किंवा २३ जानेवारीला महापौर पदाचे आरक्षण निघेल आणि ३० जानेवारीला महापौर निवडीचे नोटिफिकेशन निघणार आहे. त्यामुळे आम्ही घाई करत नाही. त्यातच जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही जाहीर झाल्या. त्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत दि. २१ आहे. सध्या जिल्हा परिषदेसाठी युतीच्या घटक पक्षांसोबत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही बोलणी सुरू आहेत.शिंदेसेनेचे दोन नगरसेवक सोबत आल्यास युतीचे संख्याबळ ४१ होईल. महायुतीतील आणखी एक नैसर्गिक मित्र राष्ट्रवादी (अजित पवार) बाहेर राहतो. त्यांना बरोबर घेण्याबाबत विचार होऊ शकतो, पण आधी निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या १६ नगरसेवकांना निर्णय करावा लागेल. मग त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी. राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करतील. ते बरोबर आले तर त्यांचे स्वागतच आहे. कारण, काठावरचे बहुमत विकासासाठी सोयीचे नसते. त्यामुळे आम्ही त्यांना सोबत घेण्याबाबत प्रयत्न करू, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP to retain Sangli Mayor post with Shinde Sena support.

Web Summary : BJP aims to retain Sangli Mayor post with support from Shinde Sena. Discussions are ongoing, and Nationalist Congress Party (Ajit Pawar) inclusion is possible for stability. The election schedule is set for January.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६chandrakant patilचंद्रकांत पाटीलMayorमहापौरBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे