शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? देशवासीयांना केलं मोठं आवाहन
2
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
3
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
4
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
5
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
6
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
7
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
8
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
9
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
10
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
11
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
12
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
13
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
14
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
15
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
16
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
17
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
18
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
19
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
20
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानक परिसर बनतोय मायाबाजार

By admin | Updated: February 7, 2015 00:15 IST

अवैध व्यवसायांना ऊत : इस्लामपुरात रोडरोमिओंचा मुलींना त्रास

अशोक पाटील - इस्लामपूर बसस्थानकामागील परिसर ‘मायाबाजार’ बनू लागला आहे. या परिसरात राजरोस रस्त्यावर जुगार खेळला जातो. शिवाय सकाळी व दुपारी महिला व मुलींना रोडरोमिओंचा त्रास होत आहे. त्यांना काही गुंडांचा आशीर्वाद असून, याकडे पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.सध्या बसस्थानकामागील मोकळ्या जागेत विविध प्रकारचे जुगाराचे खेळ खेळले जातात. त्यातून सर्वसामान्यांना लुटले जात आहे. परिसरातील काही टपऱ्यांतून छुप्या पध्दतीने मटका घेतला जातो. काही टपऱ्यांमधून अश्लील चित्रफितींची विक्रीही केली जाते. याच मार्गावर बोरगाव, ताकारीकडे जाणाऱ्या वडापच्या वाहनांची मोठी गर्दी असते. ही वाहने दुकानांसमोर लावली जात असल्याने अनेकवेळा वादावादीचे प्रकार घडले आहेत. वाहनांमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावल्याने या मार्गावरुन ये—जा करणाऱ्या प्रवासी व महिला वर्गाला त्रास होत असतो.शहरात सर्व प्रकारची महाविद्यालये असल्याने ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या मुला—मुलींची संख्या मोठी आहे. सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत या मार्गावर महाविद्यालयीन युवतींचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. यामुळेच या वेळेत येथे रोडरोमिओ येथे उभे राहून मुलींची टिंगल करताना दिसतात.
बसस्थानकावरील परिस्थिती तर अधिकच गंभीर बनली आहे. दररोज हजारो प्रवासी ये—जा करणाऱ्या बसस्थानकासाठी केवळ एका पोलिसाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे महाशय नारळाच्या झाडाखाली सावलीचा आसरा घेऊन बसस्थानकावर नजर ठेवून असतात. त्यामुळे खिसेकापूंनी फायदा उठवला आहे. हे सर्व पोलिसांना माहीत असूनही याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन बसस्थानक परिसरात सुरू असलेले सर्व अवैध धंदे बंद करावेत, तसेच रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.