कासेगावात १४ ठिकाणी मटका सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:25 IST2021-04-18T04:25:05+5:302021-04-18T04:25:05+5:30
कासेगाव : पालकमंत्री जयंत पाटील यांचे गाव असलेल्या कासेगाव (ता. वाळवा) येथे तब्बल १४ ठिकाणी मटका सुरू आहे. गावात ...

कासेगावात १४ ठिकाणी मटका सुरू
कासेगाव : पालकमंत्री जयंत पाटील यांचे गाव असलेल्या कासेगाव (ता. वाळवा) येथे तब्बल १४ ठिकाणी मटका सुरू आहे. गावात व परिसरात बेकायदेशीर दारू विक्री, जुगार व इतर अवैध धंद्यांना ऊत आला आहे. संचारबंदीतही हे अवैध व्यवसाय तेजीत सुरू आहेत.
कासेगावमध्ये १४ ठिकाणी मटका सुरू असून पोलीस ठाण्यापासून दोनशे मीटरवर चार ठिकाणी मटका अड्डे आहेत. गावात दुचाकीमधील पेट्रोल चोरी वाढली आहे. नागरिकांनी संशयितांचे पेट्रोल चोरतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देऊनही तपास सुरू केलेला नाही. परिसरातील नेर्ले, काळमवाडी, केदारवाडी आदी गावातही अनेक बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे बोलले जात आहे.
पालकमंत्री जयंत पाटील यांच्याच गावात हे सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असतानाही हे धंदे तेजीत सुरू आहेत.
चौकट
अमर, अकबर, अँथोनी चर्चेत
कासेगाव
पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे तीन तरुण पोलीस अमर, अकबर, अँथोनी म्हणून परिचित आहेत. पोलीस ठाण्यामध्ये येणारे सावज हेरून ‘अर्थ’पूर्ण तडजोडी करण्यात हे तिघेजण तरबेज आहेत. काही दिवसांपूर्वी जुगार अड्ड्यावर छापा टाकून या तिघांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परस्परच मोठा माल पसार केल्याची चर्चा आहे.