शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत कृष्णा नदीतून वाळूचा बेमाप उपसा!, महसूलची डोळेझाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 16:05 IST

कृणाघाटावर बेकायदा औटी

मिरज : राज्यात सर्वत्र नदीतून वाळूउपशावर निर्बंध असताना कृष्णा नदी मात्र नियमाला अपवाद ठरली आहे. कृष्णाघाटावर कृष्णेतून बेबंदपणे वाळू उपसा सुरू आहे. या उपशाला महसूल प्रशासनाने रीतसर परवाना दिला आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे.कृष्णाघाटावर अर्जुनवाड (जि. कोल्हापूर) गावाच्या हद्दीत वाळू उपशासाठी औटी तयार करण्यात आली आहे. नदीतून बोटीद्वारे उपसा करून वाळू बाहेर काढली जात आहे. उपसा केलेली वाळू विक्रीसाठी ट्रॅक्टरमधून भरभरून नेली जात आहे. माती उपशासाठी औटी तयार केल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र वाळूचाच उपसा सुरू असल्याचे प्रत्यक्ष पाहणीवेळी दिसून आले.कृष्णा नदीच्या उगमापासून महाराष्ट्र हद्दीत कोठेही वाळूउपशाला परवानगी नाही. शासनाने वाळूचे लिलाव अद्याप सुरू केलेले नाहीत. गेल्या सुमारे सहा-सात वर्षांपासून वाळू उपसा बंद असल्याने बांधकामांसाठी कृत्रिम वाळूचा वापर सुरु झाला आहे. मात्र काही घरमालक व बांधकाम ठेकेदार वाळूच्याच वापरावर ठाम असतात. त्यांच्यासाठी चोरट्या पद्धतीने वाळूउपसा केला जात आहे. वाट्टेल त्या किमतीला या वाळूची विक्री व खरेदी होते.

महसूलची डोळेझाक?वाळूतस्करांच्या या कृत्यामुळे कृष्णेची ओरबड सुरू आहे. राजरोस, भरदिवसा औटी तयार करून वाळूचा उपसा सुरू असतानाही स्थानिक तलाठी व महसूल प्रशासन शांत कसे? हा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. या कामावर चौकशी केली असता मातीच्या उपशासाठी औटी केल्याचे सांगण्यात आले, प्रत्यक्षात मात्र वाळूचाच उपसा सुरू असल्याचे दिसून आले. उपसलेली वाळू ट्रॅक्टरमधून भरून विक्रीसाठी नेली जात होती.

टॅग्स :Sangliसांगलीriverनदी