डालमिया शुगर इंडस्ट्रीजतर्फे मास्कवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:27 IST2021-04-27T04:27:38+5:302021-04-27T04:27:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोकरुड : डालमिया भारत फाउंडेशन व डालमिया भारत शुगर इंडस्ट्रीज यांच्या वतीने पंचायत समिती व शिराळा ...

Maskwatap by Dalmia Sugar Industries | डालमिया शुगर इंडस्ट्रीजतर्फे मास्कवाटप

डालमिया शुगर इंडस्ट्रीजतर्फे मास्कवाटप

लोकमत न्यूज नेटवर्क

कोकरुड : डालमिया भारत फाउंडेशन व डालमिया भारत शुगर इंडस्ट्रीज यांच्या वतीने पंचायत समिती व शिराळा तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी आणि ग्रामस्थ यांना सॅनिटायझर आणि मास्क वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल, विस्तार अधिकारी माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

डालमिया भारत शुगर इंडस्ट्रीजचे श्री मानव संसाधन विभाग प्रमुख व्यवस्थापक कुलदीप खोब्रागडे यांच्या हस्ते सर्व पंचायत समिती कामगार, सफाई कामगार, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग इतर सर्व विभागांना मोफत मास्कवाटप करण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, डालमिया भारत फाउंडेशन व दालमिया भारत शुगर यांनी दहा हजार मास्कवाटप करण्याचा संकल्प हाती घेतला आहे.

सुनील कांबळे-माजगावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी शिवाजी पाटील, बालाजी शिंदे, विलास पाटील, वैभव कदम, अरुण जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Maskwatap by Dalmia Sugar Industries