शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या मुलींच्या डोईवर राज्यपालांच्या उपस्थितीत पडणार अक्षता; दिपाली सय्यद यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 14:14 IST

मुख्यमंत्र्यांचाही ऑनलाईन सहभाग, पंधरा कोटीच्या मदतीची तरतूद

सांगली : गरीब पूरग्रस्तांच्या घरातील दत्तक घेतलेल्या १ हजार मुलींपैकी पाच मुलींचा प्रातिनिधीक स्वरुपात विवाह सोहळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते ९ सप्टेंबरला कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे करण्यात येणार आहे, अशी माहिती अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या दिपाली सय्यद यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

त्या म्हणाल्या की, कसबे डिग्रजमध्ये ९ सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता कार्यक्रम होणार आहे. राज्यपालांच्या उपस्थितीत तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन सहभागाने हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास पालकमंत्री जयंत पाटील, भाजपचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार संजयकाका पाटील, शिवसेना नेते नितीन बानुगडे-पाटील आदी उपस्थित राहणार आहे.

दिपाली सय्यद म्हणाल्या की, आमच्या ट्रस्टमार्फत गरिब पूरग्रस्तांच्या घरातील १ हजार मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या विवाहाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यातील शंभर मुलींचे विवाह केले आहेत. उर्वरीत ९०० मुलींपैकी पाच मुलींचे प्रातिनिधीक विवाह कसबे डिग्रजला होणार आहे.

राज्यपालांसह राज्य व केंद्रातील मंत्री, आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत त्यांच्या डोक्यावर अक्षता पडणार आहेत. याच कार्यक्रमात संबंधित मुलींना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या ठेवपावतीचे व पासबुकचे वितरणही राज्यपालांच्या हस्ते होईल. दिपाली सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केल्यापासून मदतीचा ओघ सुरु आहे. पूरग्रस्तांच्या घरबांधणीसाठी १० कोटी तर पूरग्रस्तांच्या मुलींच्या विवाहासाठी ५ कोटी अशी १५ कोटींच्या मदतीची तरतुद केली आहे, असे सय्यद यांनी सांगितले.

सामाजिक कामामुळे सर्व एकत्र-

सामाजिक कार्य असल्याने या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व पक्षांचे नेते एकत्र येत आहेत. राज्यातील राजकारण वेगळे, मात्र समाजासाठी भूमिका वेगळी ठेवायला हवी, याची जाणीव महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना आहे, असे सय्यद म्हणाल्या.

मी राजकारण सोडणार नाही-

दिपाली सय्यद म्हणाल्या की, चांगल्या लोकांनी राजकारणात यायला हवे. मागील निवडणूक मी राष्ट्रवादीच्या विरोधात लढविली होती. त्यामुळे यापुढेही मी राजकारण सोडणार नाही, पण समाजकार्यात मला सर्वांची साथ हवी आहे.

टॅग्स :deepali sayedदीपाली सय्यदSangliसांगलीUddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी