शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देवस्थान जमीन प्रश्नी सांगलीत सोमवारी पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 17:22 IST

राज्य शासनाकडून शेतकऱ्यांची फसवणूक

सांगली : देवस्थान इनाम वर्ग तीनची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अकोले ते लोणी पायी मोर्चा काढला होता. यावेळी तीन महिन्यात शासनाने प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले असून त्यास नऊ महिने झाले आहे. तरीही शासनाकडून आश्वासनाची पूर्तता झाली नाही, म्हणून सांगलीत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या कार्यालयावर दि. ८ जानेवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिली.उमेश देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांनी अकोले ते लोणी पायी मोर्चा काढला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेत महाराष्ट्र शासनाकडून तीन मंत्री चर्चेसाठी उपस्थित होते. त्यामध्ये सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचा समावेश होता. लेखी आश्वासनात शेतकऱ्यांचा प्रश्न तीन महिन्यात सोडविण्यात येणार असल्याचे म्हटले होते. पण आज नऊ महिने झाले तरीही शासनाने त्याची अंमलबजावणी केली नाही.उलट या शेतकऱ्यांचे प्रश्न आणखी गुंतागुंतीचे होत आहेत. पिढ्यानपिढ्या जमीन कसत असून देखील हा शेतकरी कागदोपत्री उपरा ठरत आहे. महाराष्ट्रातील सर्व इनामे खालसा केली. परंतु इनाम वर्ग तीन आजही खालसा केले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवल उभे करताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. म्हणूनच पालकमंत्री खाडे यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या..

  • देवस्थान ईनाम वर्ग तीन खालसा करून कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर करा.
  • सात-बारा उताऱ्यावरील कब्जेदार सदरातील नोंदी इतर हक्कात घातल्या आहेत, त्या पूर्ववत कब्जेदार सदरात घ्या.
  • मुस्लीम कुटुंबाना दिलेल्या जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावरील वक्फ सत्ता प्रकार ही नोंद रद्द करून शेतकऱ्यांची नोंद कब्जेदार सदरात घ्या.
  • जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज तसेच दीर्घ मुदतीची कर्जे उपलब्ध करा.
टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीguardian ministerपालक मंत्री