शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-बंगळुरू हरित महामार्गात बाधित ३८ गावच्या शेतकऱ्यांचा मोर्चा, सांगलीत आंदोलक-पोलिसांमध्ये झटापट 

By अशोक डोंबाळे | Updated: June 5, 2023 17:23 IST

आंदोलकांचा जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न

सांगली : पुणे-बंगळुरू हरित महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीला योग्य मोबदला मिळाला पाहिजे. तसेच गायरानमधील रहिवासी अतिक्रमण भूमिहीन, शेतमजूर, कामगारांच्या वहिवाटीप्रमाणे नि:शुल्क नावे करावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चा आल्यानंतर प्रवेशद्वारात पोलिसांनी रोखला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांत जोरदार झटापट, शाब्दिक चकमकी उडाल्या.शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष दिगंबर कांबळे, ॲड. सुभाष पाटील, ॲड. अजित सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. गायरान रहिवासी अतिक्रमणाच्या नोटिसा आलेल्या महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या. मोर्चाची सुरुवात विश्रामबागमधील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली. जोरदार घोषणाबाजी करत भर उन्हात मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला.पोलिस अधिकाऱ्यांना आंदोलकांमध्ये वृद्ध महिला व लहान मुले असल्यामुळे त्यांना सावलीत बसू द्या, अशी विनंती केली. परंतु, पोलिसांनी ती विनंती नाकारली. पोलिसांनी आंदोलकांना प्रवेशद्वारातच रोखल्यामुळे आंदोलक आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार झटापट, शाब्दिक चकमकी उडाल्या. अखेर प्रवेशद्वारातच मोर्चातील शेतकऱ्यांनी ठिय्या मारला. शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्याचे निवेदन दिले.निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, तहसीलदार यांनी गायरान रहिवासी अतिक्रमण घरे पाडण्यासाठी दिलेल्या नोटिसीला सामुदायिक उत्तर देण्यासाठी परवानगी दिली पाहिजे. तसेच पुणे-बंगळुरू हरित महामार्ग बाधित क्षेत्राला एकरी दोन कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे, अशी मागणी केली.आंदोलनात बाबूराव लगारे, शरद पवार, प्रा. प्रल्हाद गायकवाड, विष्णू जाधव, नामदेव पाटील, प्रसाद खराडे, विश्वास साखरे, प्रवीण माळी, तानाजी चव्हाण आदींसह महिला आणि शेतकरी सहभागी होते.

महामार्गाबाधितांचा प्रश्न सोडविणारपुणे-बंगळुरू हरित महामार्गाबाबत संघर्ष समिती सोबत तातडीने बैठक घेणार असून तो प्रश्न सोडविण्यात येणार आहे. तसेच गायरान रहिवासी अतिक्रमणाबाबत शासनस्तरावर चर्चा सुरू आहे. धोरणात्मक निर्णय राज्य शासनाकडूनच घेतला जणार आहे, असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील यांनी दिले.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गagitationआंदोलन