कोरोनाबाधित गावातून प्रशासनाच्या मॅरेथॉन बैठका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:34 IST2021-04-30T04:34:48+5:302021-04-30T04:34:48+5:30

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील ज्या गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्या गावांवर प्रशासकीय यंत्रणेने लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना ...

Marathon meetings of the administration from the Corona-affected village | कोरोनाबाधित गावातून प्रशासनाच्या मॅरेथॉन बैठका

कोरोनाबाधित गावातून प्रशासनाच्या मॅरेथॉन बैठका

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील ज्या गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्या गावांवर प्रशासकीय यंत्रणेने लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी केल्यानंतर त्यानुसार पोलीस, महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाधित गावांना भेटी देत मॅरेथॉन बैठका घेण्याचा धडाका लावला आहे.

कापूसखेड, साखराळे, बोरगाव, रेठरेहरणाक्ष, येडेमच्छिंद्र, बहे, रेठरेधरण या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या आणि कोरोनाबाधितांची संख्याही जास्त असलेल्या गावांमध्ये पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी संयुक्त भेटी देत कोरोनाला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांना कोविडसंदर्भातील नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. मास्कचा वापर, सामाजिक अंतर, कारणाशिवाय घराबाहेर पडू नका आणि जे रुग्ण गृह विलगीकरणात आहेत त्यांनी बाहेर फिरू नये, अशा सूचना दिल्या आहेत. या नियमावलीचा भंग केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा देशमुख यांनी दिला.

कामेरी, शिवपुरी या गावात सहायक पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी भेट दिली. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना कोरोनाबाबत घ्यावयाच्या दक्षतेच्या सूचना दिल्या. सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांनी शहरातील चार प्रभागामध्ये भेटी देत तेथील नगरसेवकांच्या समवेत बैठका घेतल्या. शहाजी पाटील, संजय कोरे, अमित ओसवाल, सुनीता संकपाळ व वैशाली सदावर्ते उपस्थित होत्या.

हुबालवाडी, फार्णेवाडी, गौंडवाडी, साटपेवाडी, दुधारी, जुनेखेड, मसुचीवाडी येथे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी ग्राम दक्षता समितीच्या बैठका घेऊन मार्गदर्शन केले. तर पोलीस उपनिरीक्षक समाधान लवटे यांनी रेठरेहरणाक्ष, कि. म. गड, बेरडमाची, लवणमाची, बिचूद, भवानीनगर या गावातील आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्यांबरोबर बैठका घेत कोरोनाबाबत घ्यावयाच्या दक्षतेच्या उपाययोजनांची माहिती दिली.

Web Title: Marathon meetings of the administration from the Corona-affected village