शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुपारी देऊन सांगलीतील कंत्राटदार माणिकराव पाटील यांचा खून?, आतापर्यंत १५ ते २० जणांची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 11:55 IST

माणिकराव पाटील यांना प्लॉट बघण्यासाठी १० ऑगस्ट रोजी चोरीच्या मोबाईलवरून बोलवले होते. त्यानंतर हा मोबाईल बंद करण्यात आला,. तो आजतागायत बंद आहे.

शीतल पाटीलसांगली : कंत्राटदार माणिकराव विठ्ठल पाटील यांचा खून सुपारी देवूनच करण्यात आल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे आता पोलिसांनी सुपारीबहाद्दारांकडे तपासाचा मोर्चा वळविला असून काही पंटरची चौकशीही हाती घेतली आहे. खूनाच्या घटनेला आठवडा लोटला तरी अद्याप उलघडा होऊ शकलेला नाही.सांगलीतील कंत्राटदार माणिकराव पाटील यांचे अपहरण करण्यात आले होते. कवठेपिरानजवळ वारणा नदीत हात बांधलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी खूनाची शक्यता गृहीत धरून तपासाला गती दिली. आतापर्यंत १५ ते २० जणांची चौकशी करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. पण आतापर्यंत कोणतेही धागेदोरे मिळालेले नाहीत.पाटील यांच्याशी वाद झालेल्या अनेक संशयितांची पोलिसांनी चौकशी केली. त्यातील काही जणांशी त्यांचा कित्येक महिन्यापासून संपर्कही झाला नसल्याचे आढळून आले. त्यामुळे आता पोलीसांना या खूनामध्ये सुपारी दिल्याचा संशय आहे. हा खून अत्यंत नियोजनबद्ध रितीने करण्यात आला आहे.चोरीच्या मोबाईलवरून त्यांना बोलावणे, त्यानंतर हा मोबाईल बंद ठेवणे, पाटील यांना नदीत ढकलल्यानंतर त्यांची अलिशान गाडी कोंडिग्रे फाटा येथे नेवून लावणे. त्यांना रात्री आठनंतर बोलविणे, सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणीच दबा धरून बसणे या गोष्टीमुळे खूनापूर्वी संशयितांनी मोठी आखणी केल्याचे स्पष्ट होते. शवविच्छेदन अहवालात पाटील यांचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पण हा खून का करण्यात आला याचे कोणतेही धागेदोरे मिळाले नाहीत.

तो मोबाईल अद्याप बंदचमाणिकराव पाटील यांना प्लॉट बघण्यासाठी १० ऑगस्ट रोजी चोरीच्या मोबाईलवरून बोलवले होते. त्यानंतर हा मोबाईल बंद ठेवण्यात आला. पाटील त्यादिवशी तिथे न गेल्यामुळे १३ रोजी पुन्हा याच मोबाईल नंबरवरून फोन करून तुंग येथे बोलविण्यात आले. सुरूवातीला ते आष्टा येथे गेले होते. त्यानंतर ते मोबाईलवर कॉल आल्यामुळे तुंग (ता. मिरज) येथील मिणचे मळ्याजवळ आले. त्यानंतर हा मोबाईल बंद करण्यात आला,. तो आजतागायत बंद आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस