कासेगाव येथे ८३० ग्रॅम वजनाचा आंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:20 IST2021-05-29T04:20:44+5:302021-05-29T04:20:44+5:30

कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील शेतकरी संभाजी पाटील यांच्या शेतातील शेवरा जातीच्या आंब्याच्या झाडाला तब्बल ८३० ग्रॅम ...

Mango weighing 830 grams at Kasegaon | कासेगाव येथे ८३० ग्रॅम वजनाचा आंबा

कासेगाव येथे ८३० ग्रॅम वजनाचा आंबा

कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील शेतकरी संभाजी पाटील यांच्या शेतातील शेवरा जातीच्या आंब्याच्या झाडाला तब्बल ८३० ग्रॅम वजनाचा आंबा लागला आहे. इतर आंब्यांचे वजन सरासरी पावणेआठशे ते आठशे ग्रॅमच्या दरम्यान आहे.

संभाजी पाटील यांनी चार वर्षांपूर्वी शेताच्या बांधावरील कार्यक्रमात भेट म्हणून मिळालेली शेवरा जातीची दोन आंब्याची रोपे लावली. त्यांची योग्यप्रकारे त्यांनी निगराणी केली. दोन वर्षांपासून या झाडांना आंबे लागण्यास सुरुवात झाली. गतवर्षी कमी प्रमाणात आंबे लागले होते. यावर्षी आंब्याला मोहोर आल्यानंतर पाटील यांनी औषध फवारणी केली. सध्या आंबे लगडले आहेत. एका आंब्याचे वजन तब्बल ८३० ग्रॅम भरले आहे. इतर आंब्यांचे सरासरी वजनही ७५० ग्रॅम ते ८०० ग्रॅमच्या दरम्यान आहे.

फोटो : २८०५२०२१-आयएसएलएम-कासेगाव आंबा

Web Title: Mango weighing 830 grams at Kasegaon