सांगलीत २४ पासून आंबा महोत्सव; रत्नागिरी, देवगड हापूससह स्थानिक केशर आंबा उत्पादकही येणार

By अशोक डोंबाळे | Published: May 21, 2024 06:23 PM2024-05-21T18:23:31+5:302024-05-21T18:23:53+5:30

सांगली : कृषी विभाग व कृषी पणन मंडळामार्फत दि. २४ ते २६ मे २०२४ या कालावधीत उत्पादक ते ग्राहक ...

Mango Festival in Sangli from 24 may | सांगलीत २४ पासून आंबा महोत्सव; रत्नागिरी, देवगड हापूससह स्थानिक केशर आंबा उत्पादकही येणार

सांगलीत २४ पासून आंबा महोत्सव; रत्नागिरी, देवगड हापूससह स्थानिक केशर आंबा उत्पादकही येणार

सांगली : कृषी विभाग व कृषी पणन मंडळामार्फत दि. २४ ते २६ मे २०२४ या कालावधीत उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेंतर्गत ‘सांगलीआंबा महोत्सव’चे कच्छी जैन भवन, सांगली येथे आयोजन केले आहे. या महोत्सवाचा लाभ सांगलीकरांनी घ्यावा, असे आवाहन कृषी पणन मंडळ कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.

डॉ. सुभाष घुले म्हणाले, विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळण्यासाठी हा आंबा महोत्सव आयोजित केला आहे. आंबा महोत्सवाचे उद्घाटन २४ मे रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व पोलिस अधीक्षक संदीप घुगे उपस्थित राहणार आहेत. 

महोत्सवामध्ये रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, स्थानिक केशर आंबा उत्पादक व इतर विविध जातींचे आंबा उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. महोत्सवामध्ये आंबा उत्पादक शेतकऱ्यांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्राहकांना कोकणातील अस्सल हापूस आंबा व स्थानिक केशर आंबा उत्पादकांकडून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

Web Title: Mango Festival in Sangli from 24 may

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.