खात्यातील पैसे सांभाळा, ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:29 IST2021-09-22T04:29:07+5:302021-09-22T04:29:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात कोरोना काळात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बँक ग्राहकांची एक छाेटी ...

खात्यातील पैसे सांभाळा, ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात कोरोना काळात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बँक ग्राहकांची एक छाेटी चूकसुद्धा त्यांना महागात पडू शकते. त्यामुळे बँकिंगचे ऑनलाईन कोणतेही व्यवहार अत्यंत सावधगिरीने करताना फसवणुकीच्या घटना कोणत्या पद्धतीने होत आहेत, याची माहिती घेऊन त्याबाबत काळजी घेण्याचे आवाहन बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे.
चौकट
सायबर क्राईम वाढतेय
वर्ष एकूण घटना
२०१७ ३२
२०१८ ४०
२०१९ ३७
२०२० ५७
चौकट
२०२० मधील सायबर क्राईम
धमकी/ब्लॅकमेल ६
लैंगिक छळ १
मुले, महिलांवर दादागिरी ५
फसवणूक २६
ऑनलाईन बँकिंग फसवणूक ५
चौकट
या गोष्टींचे पालन करा
सांगलीतील आर्थिक साक्षरता केंद्राचे प्रमुख लक्ष्मीकांत कट्टी यांनी सांगितले की, तुमचा एटीएम पीन बदलत रहा
कोणत्याही ऑनलाईन आमिषाला बळी पडू नका
अनोळखी लिंक ओपन करु नये तसेच ओटीपी शेअर करु नये