शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बँकेला दोन कोटीला गंडा घालणारा जेरबंद, विश्रामबाग पोलिसांची बेलापूर येथे कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 17:46 IST

बेदाणा प्रोसेसिंग युनिट व पॅकेजिंग प्रकल्प उभारणीच्या नावाखाली एक कोटींचा गंडा घालून झाला होता पसार

सांगली : येथील एचडीएफसी बँकेला बेदाणा प्रोसेसिंग युनिट व पॅकेजिंग प्रकल्प उभारणीच्या नावाखाली एक कोटी ९८ लाख रुपयांना गंडा घालून पसार झालेल्या मुख्य सूत्रधार महेश हणमंत जाधवर (वय ३५, मूळ रा. वालवड, ता. बार्शी) याला नवी मुंबईतील बेलापूर येथे अटक केली. विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुख्य संशयित मुकुंद हणमंत जाधवर याच्यासह नात्यातील सातजणांनी डिस्ट्रीक्ट ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी उभारली होती. या कंपनीमार्फत बेदाणा प्रोसिसिंग युनिट व पॅकिंग प्रकल्प उभारण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड योजनेतून एक कोटी ९८ लाख रुपयांचे कर्ज काढले होते. कर्जाची रक्कम तीन व्हेंडर कंपन्यांच्या नावावर वर्ग करण्यात आली. प्रकल्प तीन महिन्यात पूर्ण करून कागदपत्रे बँकेकडे सादर करण्याचे बंधन होते. बँकेकडे तारण जमिनीवर प्रकल्प उभारलाच नाही.कंपनीच्या नावावर कर्ज घेऊन बँकेला एक कोटी ९८ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे निदर्शनास आले. एचडीएफसी बँकेचे सहउपाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी यांनी फिर्याद दिली होती. डिसेंबर २०२४ मध्ये गुन्हा दाखल होताच महेश जाधवर याच्यासह संशयित पसार झाले होते. विश्रामबागचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या पथकाला जाधवर हा नवी मुंबईतील बेलापूर येथे असल्याची माहिती मिळाली.पोलिस कर्मचारी इरफान पखाली, विष्णू गावडे, प्रेरणा नाईक यांच्या पथकाने जाधवर याला मंगळवारी ताब्यात घेतले. बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवस कोठडी सुनावली. सरकारी वकील अमर रजपूत यांनी युक्तिवाद केला.

दोन गटात जोरदार वादावादीसंशयित जाधवर याच्या चौकशीसाठी स्वाभिमानी स्वराज्य सेनेने आंदोलन केले होते. तेव्हा जाधवर याने संघटनेचे अध्यक्ष प्रशांत सदामते यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, जाधवर याला न्यायालयात आणल्यानंतर त्याचे समर्थक आणि प्रशांत सदामते समर्थक समोरासमोर आल्यामुळे वादावादी, शिवीगाळ झाली.