शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास २० वर्षांची शिक्षा, जिल्हा न्यायालयाचा निकाल; दहीवडीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 13:47 IST

पीडिता घरी एकटीच होती. मध्यरात्रीच्या सुमारास आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.

सांगली : तासगाव तालुक्यातील एका गावात नात्यातीलच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. संभाजी आनंदराव जाधव (वय ३१, रा. दहीवडी, ता. तासगाव) असे आरोपीचे नाव आहे. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश हातरोटे यांनी हा निकाल दिला.खटल्याची अधिक माहिती अशी की, २९ मे २०१९ रोजी हा प्रकार घडला होता. पीडितेचे आई-वडील वारले असल्याने ती आपल्या बहिणीसोबत राहत होती. पीडितेची बहीण जत येथील नातेवाइकाच्या घरी गेल्याने पीडिता घरी एकटीच होती. २९ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी संभाजी जाधव याने तिच्यावर अत्याचार केला. पीडिता घरी एकटीच असल्याने ती विरोध करू शकली नाही. दुसऱ्या दिवशी पीडितेने आपल्या बहिणीला याची हकीकत सांगितली. पीडितेची एक नातेवाईक मुंबईमध्ये राहण्यास असल्याने ती आल्यानंतर पीडितेच्या बहिणीने ११ जून रोजी तासगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती.पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून जाधव याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. पीडितेने जबाबावेळी सरकार पक्षाच्या वतीने जबाब दिला. परंतु उलट तपासावेळी तिने फितूर होत आरोपीच्या बाजूने जबाब दिला. मात्र, सरकारी वकिलांनी उलट तपास घेत सर्व घटनाक्रम तिच्याकडून जाणून घेतला. त्यानंतर सरकारी वकिलांनी शुक्रवारी युक्तिवाद करत जादा शिक्षेची मागणी केली. उपलब्ध पुरावे, साक्षीआधारे न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे यांनी काम पाहिले. पैरवी कक्षाचे पोलीस हवालदार वंदना मिसाळ, शरद राडे, गणेश वाघ यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय